मुंबई - अर्थसंकल्पाच्या विभागवार चर्चेला सुरूवात झाली या चर्चेत सहभागी होताना आमदार आशिष शेलार यांनी पर्यावरण विभागाच्या कामावर जोरदार टीका केली. नुकताच बेस्टच्या ताफ्यामध्ये नव्या ई बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबसचे पहिले टेंडर हे केवळ २०० बससाठी काढण्यात आले होते. शिवाय पुन्हा बसची संख्या वाढवून ती ९०० करण्यात आली. पुन्हा यामध्ये वाढ करुन ही संख्या १४०० करण्यात आली. तसेच मुंबईतील रस्त्यावर चाचणी न घेता एवढ्या बस घेण्याचा निर्णय किती योग्य आहे, असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
हा व्यवहार ज्या कंपनीशी करण्यात आला त्या व्यवहारावर मात्र गंभीर स्वरूपात बोट ठेवण्याचे काम शेलार यांनी केले. युरोपियन युनियनसह जगातील अनेक देशांनी घोटाळेबाज म्हणून घोषीत केलेल्या आणि पनामा पेपर्समध्ये नाव आलेल्या पाकिस्तानी एजन्टचा पैसा असलेल्या कंपनीला मुंबईच्या बेस्टच्या ई बसचे कंत्राट दिल्याचा गंभीर आरोप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केला आहे.
बेस्टसाठी १४०० बस कॉसीस ई मोबिलिटी या परदेशी कंपनीकडून घेण्याचा निर्णय करण्यात आला. राज्य शासनाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत याबाबतचा करार १ आक्टोबर २०२१ रोजी केला. या कंपनीला २ हजार ८०० कोटी रूपये देण्याचे मान्य करण्यात आले. या कंपनीचा सीईओ हा कॅनडातील नागरीक असून त्याचे नाव तुमुलूरी असे आहे. हा तुमलुरी म्हणजे जागतीक पातळीवर घोटाळेबाज म्हणून घोषीत असून ज्याप्रमाणे भारताना निरव मोदीला घोटाळेबाज म्हणून घोषीत केले आहे. त्याप्रमाणे हा तुमलुरी असून त्याला युरिपेयन युनियन सह माल्टा, कॅनडा यांनी हजारो कोंटीच्या घोटाळयात फरार व मुख्य आरोपी म्हणून घोषीत केले आहे. त्यावर या देशामध्ये विविध ठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्यावर कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा गंभीर ताशेरे कसे ओढले आहेत, हे सुध्दा आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात वाचून दाखवले.
ही कंपनीमध्ये दोन मोठ्या गुंतवणुकदारांचे पैसे असून त्यांची नाव पनामा पेपरमध्ये जाहीर झाली होती. यातील शौकत अली अब्दुल गफूर हा पाकिस्तानी एजन्ट असून तो लिबियामध्ये काम करतो, असा आरोप शेलार यांनी केला. हवाला रॅकेट चालवण्याचे तो शस्त्र पुरवठादार आहे. तसेच याच कंपनीमध्ये अन्य एका माणसाची गुंतवणूक असून त्याचे नाव असद अली शौकत असून हा पाकिस्तानी असून तो दुबईमध्ये राहतो. हा सुध्दा हावाला रॅकेट चालवणारा असून यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीकडून महाराष्ट्र सरकार बेस्टसाठी ई बस घेण्यासाठी का गेले? त्यांनाच हे कंत्राट का देण्यात आले? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.