ETV Bharat / city

MLA Ashish Shelar criticism on Government : हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो - आशिष शेलार - Hindu Festivals

हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?, असा सवाल करच भाजप आमदार अॅड. आशिष शेलार ( MLA Ashish Shelar ) यांनी आज (दि. 29 मार्च) पुन्‍हा एकदा सरकारवर तोफ डागली आहे. हिंदू नववर्षच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणुकांना परवानगी द्या, अशी मागणी आमदार शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्‍यावेळापासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्‍याही स्‍पष्‍ट सूचना आल्‍या नाहीत. त्‍यामुळे आज माध्यमांशी बोलताना आमदार शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

शेलार
शेलार
author img

By

Published : Mar 29, 2022, 3:23 PM IST

मुंबई - हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?, असा सवाल करच भाजप आमदार अॅड. आशिष शेलार ( MLA Ashish Shelar ) यांनी आज (दि. 29 मार्च) पुन्‍हा एकदा सरकारवर तोफ डागली आहे. हिंदू नववर्षच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणुकांना परवानगी द्या, अशी मागणी आमदार शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्‍यावेळापासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्‍याही स्‍पष्‍ट सूचना आल्‍या नाहीत. त्‍यामुळे आज माध्यमांशी बोलताना आमदार शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

मुंबईत 10 मार्च ते 8 ए‍प्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश - यावेळी आमदार शेलार म्‍हणाले, ठाकरे सरकारने गुढीपाडव्‍या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणुकांना परवानगी देण्‍याची स्‍पष्‍ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्‍यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. ज्‍यावेळी हिंदू सणंचा विषय येतो त्‍यावेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो, असा सवाल त्‍यांनी केला. तसेच मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) मुंबईत 10 मार्च ते 8 ए‍प्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्‍यासाठी दहशतवादी, देशविरोधी शक्‍ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करुन हल्‍ला करतील, अशी माहिती पोलिसांकडे आल्‍याचे ते सांगत आहेत. अशी माहिती आली असेल तर त्‍याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्‍यावी. या कारणाने मुंबईत जमावबंदीचे कमल लावण्‍यात आले आहे.

मात्र, याच काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम येतात. म्‍हणून आमचा सरकारला सवाल आहे की, हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो आणि रामभक्‍तांचा विषय आला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते, असा सवाल करत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सरकारकडे मागणी केली आहे. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन या दोन्‍ही सणांना परवानगी देण्‍यात याव्‍यात.

भाजप शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या कार्यक्रमात सहभागी होणार - आशिष शेलार म्हणाले की, या कार्यक्रमात सरकारने खोडा टाकू नये. आम्‍ही या मंडळ व समित्‍यांसोबत चर्चा करत असून या उत्‍सवात भाजप सहभागी होईल, असेही आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज जाहीर केले.

हेही वाचा - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील मेट्रोचे दोन मार्ग होणार सुरू, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.