ETV Bharat / city

Ashish Shelar Threatened : भाजपा आमदार आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

आमदार आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शेलार यांनी याबाबत मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. यापुर्वीही 2020 साली अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती.

Ashish Shelar Threatened
भाजपा आमदार आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी
author img

By

Published : Jan 8, 2022, 1:36 PM IST

मुंबई : भाजपा नेते आमदार आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी ( Ashish Shelar And His Family Threatened ) देण्यात आली आहे. याप्रकरणी आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना ( Ashish Shelar Letter Mumbai Police Commissioner ) काल पत्र लिहून तक्रार दिली आहे. दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमाकांवरुन ही धमकी दिल्याची माहिती मिळत आहे.

आमदार आशिष शेलार यांना सातत्याने दोन वेगवेगळ्या क्रमांकावरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच, एक अज्ञात व्यक्तीने त्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहले असून, दोन्ही क्रमाकांची माहिती देऊन तपास करण्याची विनंती केली आहे. तसेच, याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून मिळालेल्या धमकीची माहिती आशिष शेलार ( Ashish Shelar Letter Home Minister ) यांनी दिली आहे.

Ashish Shelar Threatened
आशिष शेलार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे यांना लिहलेले पत्र

2020 मध्येही मिळाली होती धमकी

यापुर्वी 2020 साली अशाच प्रकारे आशिष शेलार यांना धमकी देण्यात आली होती. तेव्हा याप्रकरणात वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून एकाला अटक केली होती. तसेच, अतिरेक्यांकडे आमदार आशिष शेलार यांच्यासह अन्य दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची रेकी केल्याची माहिती सापडली होती.

हेही वाचा -Reiki In Nagpur : तो तरुण नागपूरच्या सीताबर्डी परिसरात राहिला होता...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.