ETV Bharat / city

भाजप स्वबळावर लढणार? मुंबईत खलबतं - जे. पी. नड्डा यांची बैठक

भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वात शनिवारी वसंत स्मुती कार्यालयात बैठक पार पडली.

भाजप स्वबळावर लढणार? मुंबईत खलबतं
author img

By

Published : Sep 14, 2019, 9:47 PM IST

Updated : Sep 15, 2019, 9:48 AM IST

मुंबई - भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वात शनिवारी वसंत स्मुती कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत जे. पी. नड्डा यांनी राज्यात निवडणूक स्वबळावर लढण्यासंदर्भात पक्षातील नेत्यांचा विचार घेतल्याची माहिती मिळते आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊन आचारसंहिता लागू होणार असल्याने भाजप व शिवसेना यांच्यातील युतीच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची पकड मजबूत आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आप-आपले उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या बैठकीत भाजपच्या पदाधिकारी,आमदार आणि खासदारांची आगामी निवडणुकी संदर्भात काय भूमिका असेल यावर नड्डा आणि गोयल यांनी मार्गदर्शन केले.

भाजप स्वबळावर लढणार? मुंबईत खलबतं

हेही वाचा - पक्षाने आदेश दिल्यास स्वतंत्र लढू, भाजप आमदार दरेकर यांचा निर्धार

लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला आणि भाजपची देशात एकहाती सत्ता आली. भाजपचा जनाधार खूपच वाढल्याचा दावाही भाजपकडून केला जात आहे. भाजपचे वाढलेले बळ पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा लढण्याची मागणी केली जात असल्यची माहिती आहे. तर शिवसेना हे मान्य करणार नसेल तर वेळप्रसंगी भाजपने स्वबळावर लढावे, यासाठी भाजपच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांकडून आग्रह धरला जात आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादी उदयनराजेंचा पोटनिवडणुकीत दारुण पराभव करेल - नवाब मलिक

Intro:Body:

bjp meeting in mumbai over Maharashtra assembly election 

Conclusion:
Last Updated : Sep 15, 2019, 9:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.