ETV Bharat / city

राज्य सरकारच्या शरीरात औरंगजेबाचा आत्मा शिरलाय.. सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात

author img

By

Published : Aug 30, 2021, 3:39 PM IST

Updated : Aug 30, 2021, 4:28 PM IST

मंदिरे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आज राज्यभरात आंदोलन केले जात आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आज मुंबईतील ऐतिहासिक बाबुलनाथ मंदिराबाहेर आंदोलन केले. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

bjp leader sudhir mungantiwar
bjp leader sudhir mungantiwar

मुंबई - मंदिरे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आज राज्यभरात आंदोलन केले जात आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आज मुंबईतील ऐतिहासिक बाबुलनाथ मंदिराबाहेर आंदोलन केले. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलना दरम्यान सुधीर मुनगंटीवार तसेच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील एका आठवड्याच्या आत राज्य सरकारने राज्यभरातील सर्व मंदिरे सर्वसामान्य भाविकांसाठी खुली करावीत. नाहीतर, भारतीय जनता पक्षाकडून हे आंदोलन अजून तीव्र केले जाईल, असा इशाराही यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला दिला.

पत्रकारांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार

मंदिरे खुली करण्यासाठी भाजपाचं राज्यभर शंखानाद आंदोलन

राज्यातील मंदिरे सर्वसामान्य लोकांसाठी खुली करण्यात यावी. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आज राज्यभर शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. याआधीही राज्य सरकारने मंदिरे खुली करावी त्यासाठीचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीने दिला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध शिथील करण्यात आली आहेत. हॉटेल, मॉल्स आणि दारूची दुकाने हे सर्व अटी-नियम लागू करून खुली करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली. मग मंदिरातही दर्शनासाठी अटी नियम लावून, मंदिर खुली करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. त्यामुळे आज राज्यभरात असलेल्या महत्त्वाच्या मंदिरांसमोर शंखनाद आंदोलन भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे.

राज्यभरातील मंदिरे कोरोना संसर्गामुळे बंद -

कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरे दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरे उघडण्यासाठी आता भाजप आक्रमक झाली आहे. यासाठी भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसेच शंखनाद आंदोलन कऱण्यात येत आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Last Updated : Aug 30, 2021, 4:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.