ETV Bharat / city

'राज्यात साधू-संत आणि अधिकारीही सुरक्षित नाहीत'

आमदार राम कदम म्हणाले, की अत्यंत कर्तव्य दक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून समीर वानखेडे यांची ओळख आहे. या अधिकाऱ्यावर जर हल्ला होत असेल तर प्रशासनाने काम कसे करायचे, असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला आहे.

राम कदम
राम कदम
author img

By

Published : Nov 23, 2020, 6:36 PM IST

Updated : Nov 23, 2020, 7:54 PM IST

मुंबई - राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात साधू संतांसह अधिकारीही सुरक्षित नसल्याची टीका भाजपचे प्रवक्ते व आमदार राम कदम यांनी केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांच्या पथकाला काही व्यक्तींनी धक्काबुक्की केली. या घटनेनंतर कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे आमदार राम कदम म्हणाले, की अत्यंत कर्तव्य दक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून समीर वानखेडे यांची ओळख आहे. या अधिकाऱ्यावर जर हल्ला होत असेल तर प्रशासनाने काम कसे करायचे, असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले, की राज्य सरकार ड्रग माफियांना संरक्षण देत आहे की काय अशी शंका येत आहे.

राज्यात साधू-संत आणि अधिकारीही सुरक्षित नाहीत

हेही वाचा-मुंबई : कारवाई करणाऱ्या एनसीबी पथकाला धक्काबुक्की; तीन जणांना १४ दिवसांची कोठडी

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअ‌पचा अमली पदार्थाशी संबंधित डाटा मुंबई पोलिसांनी ६५ दिवस लपवून ठेवला. त्यामुळे यासंदर्भात कारवाईला वेळ लागला. राज्यातील एका मंत्र्याने ड्रग्स माफियांचे अप्रत्यक्ष समर्थन करणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर २४ तासातच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ड्रग्स माफियांवर हल्ला करण्यात आल्याचे कदम यांनी म्हटले आहे. सरकार कुणाला वाचवत आहे, हे सरकारने आता स्पष्ट करावे असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा-देशभरात कोरोनाची दुसरी लाट? जाणून घ्या संसर्गरोग तज्ज्ञांचे विश्लेषण

एनबीसी पथकाला धक्काबुकी

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या पथकाबरोबर बाचाबाची व धक्काबुक्की करणे तीन जणांचा भोवले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विपुल आगरे , युसूफ शेख, अब्दुल अमिन अशी कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.

Last Updated : Nov 23, 2020, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.