ETV Bharat / city

Pravin Darekar Mumbai Bank Case : 'मला या प्रकरणात अडकवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा पोलिसांवर दबाव'

आपण राज्य सरकारचे भ्रष्टाचार, घोटाळे बाहेर काढत होतो. त्यामुळेच राज्य सरकार आपल्यावर राग काढत आहे. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री तुरुंगात आहेत. त्यातच विरोधीपक्ष नेते सातत्याने राज्य सरकारवर आरोप करत आहेत. म्हणून विरोधी पक्षाला थांबवण्यासाठी राज्य सरकारने अशी कारवाई केली असल्याचे प्रवीण दरेकर यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

प्रविण दरेकर
प्रविण दरेकर
author img

By

Published : Apr 12, 2022, 5:19 PM IST

मुंबई - मजूर प्रकरणात न्यायालयाने विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाचा पोलिसांवर दबाव होता. मुख्यमंत्री कार्यालय आणि मुंबई पोलीस आयुक्तांचे त्या वेळचे सीडीआर तपासले तर हस्तक्षेप समोर येतील. या प्रकरणात गुन्हा दाखल करून आपल्याला अडकवण्याचा डाव राज्य सरकारचा होता, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालयावर केला आहे.

विरोधीपक्ष नेते म्हणून आपण राज्य सरकारचे भ्रष्टाचार, घोटाळे बाहेर काढत होतो. त्यामुळेच राज्य सरकार आपल्यावर राग काढत आहे. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री तुरुंगात आहेत. त्यातच विरोधीपक्ष नेते सातत्याने राज्य सरकारवर आरोप करत आहेत. म्हणून विरोधी पक्षाला थांबवण्यासाठी राज्य सरकारने अशी कारवाई केली असल्याचे प्रवीण दरेकर यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ही कारवाई करण्यासाठी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून ग्रहविभागावर दबाव टाकून अशी कारवाई करण्यास भाग पाडले असल्याचा आरोपही यावेळी प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

'सोमैया हे धाडसी नेते' : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया हे पडणारे नेते नसून इतरांना पळवून लावणारी नेते आहेत. सत्र न्यायालयात जामीन नाकारल्यानंतर उच्च न्यायालयात याबाबत कायदेशीर रित्या जामीनाची मागणी त्यांच्याकडून केली जाईल. या सर्व कामामध्ये व्यस्त असल्यामुळे ते सध्या समोर येत नाहीत. आवश्यकता असल्यास ते पोलिसांच्या समोर नक्की येतील. किरीट सोमैया हे माजी खासदार आहेत असताना देखील पोलिसांची फौज त्यांच्या घरी जाते. या माध्यमातून त्यांच्यावर दबाव तंत्र वापरले जाते. केवळ दहशत माजवण्याचा उद्दिष्टाने पोलीस काम करत असल्याचा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे. कशाचीही पर्वा न करता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचे घोटाळे ते बाहेर काढतात. सोमैया एक धाडसी नेते असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. भाजपाचे नेते तुरुंगात गेल्याशिवाय रावतांना झोप लागणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

'पीडित मुलीवर राज्यसरकारने दबाव आणला असणार' : आमदार रघुनाथ कुचिक प्रकरणांमध्ये पिडीत असलेल्या मुलीने आता थेट भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चित्रा वाघ यांनी आपल्याला खोटी जबानी देण्यासाठी प्रेरित केले असल्याचा आरोप पीडित मुलीकडून करण्यात येत आहे. मात्र या प्रकरणात राज्य सरकारनेच दबाव आणून पीडित मुलीला जबाब बदलण्यास भाग पाडले असणार. सक्षम पुरावे घेऊनच भारतीय जनता पक्षाच्या महिला नेता चित्रा वाघ काम करतात. अशा लढणाऱ्या महिला नेत्यांच्या विरोधात कट केला असल्याचे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - UP MLC Election result : प्रयागराजमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. के.पी. श्रीवास्तव यांचा विजय, पाहा विजयी उमेदवारांची यादी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.