ETV Bharat / city

प्रसाद लाड आणि राज ठाकरेंची भेट; मुंबई पालिका निवडणुकांसाठी भाजप-मनसेची युती?

author img

By

Published : Jan 23, 2021, 4:56 PM IST

Updated : Jan 23, 2021, 6:48 PM IST

राज ठाकरे यांना दुखापत झाली होती. त्यामुळे मी त्यांना पाहायला आलो होतो. राज यांच्यासोबतची भेट ही वैयक्तिक भेट असल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले.

prasad lad
प्रसाद लाड

मुंबई - भाजप आणि मनसेची युती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना आज भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे.

भाजप नेते प्रसाद लाड

राज ठाकरे यांना दुखापत झाली होती. त्यामुळे मी त्यांना पाहायला आलो होतो. राज यांच्यासोबतची भेट ही वैयक्तिक भेट आहे. भाजपचा झेंडा महापालिकेत फडकणार, त्यासाठी जे लोक येतील त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत, असे सूचक वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले आहे.

भाजपचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकणार

राज ठाकरे यांच्यासोबतची भेट वैयक्तिक भेट आहे. वेळ आल्यावर नक्कीच सांगेन. भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकेल हे मी तुम्हाला आता सांगतो. कांजूरमार्गची जागा ही केंद्र सरकारची आहे. तसेच बालहट्टामुळे मुंबईच्या जनतेवर अन्यात करण्याचे काम सरकार करत असल्याचे प्रसाद लाड म्हणाले. सरकारने जनतेच्या हिताचे काम केले पाहिजेत. बालहट्ट न करता मुंबईच्या जनतेसाठी निर्णय घ्यावेत, असेही लाड यांनी सांगितले.

अमित ठाकरे यांनी केले प्रसाद लाड यांचे स्वागत

भाजप आमदार प्रसाद लाड हे जवळपास पाऊणतास कृष्णकुंजवर होते. त्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मात्र, या चर्चेतील मुद्दे कोणते होते, हे प्रसाद लाड यांनी सांगितले नाही. प्रसाद लाड हे कृष्णकुंजवर आले तेव्हा त्यांचं स्वागत हे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी केले.

हेही वाचा - कर्जाला कंटाळुन निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची आत्महत्या, तिघांनी घेतला गळफास

हेही वाचा - दिल्ली आंदोलनात हिंसाचार करणार असल्याचे वक्तव्य संशयीताने फिरवले

Last Updated : Jan 23, 2021, 6:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.