मुंबई - भाजपा नेते मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज (रविवारी) सांताक्रूझ पोलीस स्टेशन येथे जाऊन एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या जबाबाप्रमाणे तसा एफआयआर नोंदवला होता व त्यावर त्यांची स्वाक्षरी ही घेतली. परंतु थोड्या वेळाने त्यात बदल करून दुसरा एफआयआर नोंदवण्यात आला. कोणाच्यातरी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यानेमुळे एफआयआर ( Santa Cruz Police Station FIR Change ) बदलण्यात आल्याचा आरोप मोहित कंबोज ( BJP Leader Mohit Kamboj ) यांनी केला आहे. म्हणून जोपर्यंत एफआयआरची मूळ प्रत त्यांना दिली जात नाही, तोपर्यंत ते पोलीस स्टेशन सोडणार नाहीत, तिथेच आंदोलनाला बसतील, असा इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे.
एफआयआरची मूळ प्रत गायब? : मी १२ वाजल्यापासून पोलीस स्टेशनला एफआयआर नोंदवण्यासाठी आलो आहे. माझ्या समोर संपूर्ण एफआयआर तयार करण्यात आला व त्याच्यामध्ये प्राणघातक हल्ला करणे, जमावाने एकत्र येणे अशी कलम नोंदवण्यात आली. त्यावर माझी स्वाक्षरी घेण्यात आली. परंतु काही वेळाने अधिकाऱ्यांना कोणाचा तरी फोन आला. त्यांनी त्या मूळ एफआयआरमध्ये बदल करून दुसरा एफआयआर तयार केला. या सर्वांची पोलीस स्टेशनला अधिकाऱ्याच्या रूममध्ये असलेल्या कॅमेरामध्ये त्याची नोंद झाली आहे. असे हे पहिल्यांदा होत आहे की मूळ एफआयआरमध्ये बदल करणे हा गुन्हाच आहे. अगोदर लावलेली कलमे नंतर कमी करणे हा सुद्धा गुन्हाच आहे. म्हणून जोपर्यंत मला अगोदरच्या एफआयआरची मूळ प्रत दिली जात नाही, तोपर्यंत मी पोलीस स्टेशन सोडणार नाही, असा इशाराही कंबोज यांनी दिला आहे.
एफआयआर बदलण्यासाठी कोणाचा कोण? : पोलिसांनी मूळ एफआयआरमध्ये छेडछाड केल्यानंतर मोहित कंबोज यांनी पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्याच्या रूममधून रेकॉर्डिंग करून त्याविषयी ट्विट सुद्धा केले होते. पोलीस अधिकारी यांच्यामध्ये संगनमत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूळ एफआयआर बदलणे हे चुकीचेच आहे. परंतु तो कोणाच्या सांगण्यावरून बदलण्यात आला, हे बघणेही महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले आहे.
हेही वाचा - Somaiya Criticizes Government : माझ्यावरील हल्ला ठाकरे सरकार प्रायोजित, पोलिस आयुक्त जवाबदार - सोमय्या