ETV Bharat / city

Kripashankar Singh : उत्तरप्रदेशात मराठी भाषा शिकवा.. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचे योगींना पत्र

author img

By

Published : Jun 8, 2022, 1:07 PM IST

Updated : Jun 8, 2022, 2:36 PM IST

भाजप नेते कृपाशंकर सिंह ( BJP Leader Kripashankar Singh ) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( CM Yogi Adityanath ) यांना पत्र लिहले ( Kripashankar Shingh Letter To Yogi ) आहे. या पत्रात त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यची विनंती केली ( Include Marathi in education ) आहे. मराठी भाषेत नोकरीच्या चांगल्या संधी असल्याचेही त्यांनी पत्रात नमुद केले आहे.

Kripashankar Singh Latest News
भाजप नेते कृपाशंकर सिंह

मुंबई : भाजप नेते कृपाशंकर सिंह ( BJP Leader Kripashankar Singh ) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( CM Yogi Adityanath ) यांना पत्र लिहिले ( Kripashankar Singh Letter To Yogi ) आहे. उत्तर प्रदेशातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी पर्यायी भाषा म्हणून मराठीचा समावेश करण्याची विनंती पत्रात करण्यात आली ( Include Marathi in education ) आहे. मराठी भाषेमुळे महाराष्ट्रात चांगली नोकरी मिळण्यास मदत होऊ शकते. असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

कृपाशंकर सिंह यांची प्रतिक्रिया

मराठी भाषा शाळेत शिकवा - भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. उत्तर प्रदेशातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी पर्यायी भाषा म्हणून मराठीचा समावेश करण्याची विनंती केली आहे. मराठी बोलता आल्यास यूपीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात चांगल्या नोकऱ्या मिळण्यास मदत होऊ शकते. मात्र या मागणीकडे राजकीयदृष्ट्याही पाहिले असता उत्तर भारतीयांच्या मुद्द्यांवरुन मनसेची भूमिका आधीच कठोर आहे. महाराष्ट्रात बिगर मराठी लोक येऊन नोकऱ्या काबीज करत असल्याचा आरोप मनसे करत आहे.

letter
कृपाशंकर सिंह यांचे पत्र

योगींची सहमती - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्त्वतः कृपाशंकर सिंह यांच्या मागणीला सहमती दर्शवली आहे. योगी आदित्यनाथ वाराणसीमध्ये प्रायोगिक तत्वावर मराठी भाषा शिकवण्याचा विचारात आहेत. महाराष्ट्रात या पत्रामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. कारण मनसेचा सुरवातीपासूनच महाराष्ट्रात उत्तर भारतीय आणि बाहेरील लोकांसाठी सरकारी नोकरीच्या संधींना विरोध करत आहे. तर शिवसेनेनेही महाराष्ट्रात नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांच्या प्राधान्य देण्याची मागणी करत आली आहे.

  • Maharashtra BJP leader Kripashankar Singh writes to Uttar Pradesh CM Yogi Adityanath asking him to consider Marathi as an optional language for the students of Secondary and Higher Secondary in UP "that may help students in getting better jobs in Maharashtra." pic.twitter.com/JNgZnpGnEk

    — ANI (@ANI) June 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजपाची खेळी ! - भाजप नेत्याच्या मागणीकडे महाराष्ट्राचा संदर्भ म्हणून पाहिले पाहिजे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. शिवसेना मनसेसोबत भूमिपुत्रांच्या प्रश्नावर आवाज उठवत असताना साहजिकच भाजपला परप्रांतियांना आकर्षित करण्यासाठी हा एक चांगला विषय होऊ शकतो, असे वाटते. विशेष म्हणजे काही महिन्यांत राज्यातील सर्वच पक्षांना महापालिका निवडणुका लढवायच्या आहेत आणि मुंबईसह उपनगरातही बहुसंख्य भोजपुरी भाषा बोलणारे आहेत. जे सहसा यूपीमधून येतात, त्यामुळे यूपीमध्ये मराठी भाषा शिकवण्याची मागणी ही भाजपची राजकीय खेळी मानली जात आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

हेही वाचा- Rajya Sabha election 2022 : महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकणार - मुख्यमंत्री

Last Updated : Jun 8, 2022, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.