मुंबई - भाजपचा भांडूप येथील कार्यकर्ता मेळावा हाऊसफुल्ल झाला. यावेळी ईशान्य मुंबईचे खासदार तथा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मला पक्षाने तयारी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे संभ्रमात न राहता कामाला लागले पाहिजे, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. मंत्री प्रकाश मेहता यांनीही तसेच आदेश दिल्याने किरीट सोमय्या यांची ईशान्य मुंबईतून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
यावेळी बोलताना सोमय्या भाषणात म्हणाले, 'ये तो मोदी का राज है, चिंता करनेकी कोई बात नही. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार है, राज्य सभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे है, मंत्री प्रकाश मेहता है इन सभीने मुझे चार्ज देके बता दिया है, की किरीट भाई काम पे लगजाव', असे सोमय्या यांनी म्हणताच सभागृहात किरीट सोमय्या यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या.
मंत्री प्रकाश मेहता म्हणाले, आजपासून ईशान्य मुंबईतील कोणीही पदाधिकारी नाही, तर सर्वच जण आपण कार्यकर्ते आणि आपले शक्तीपीठ हे वार्ड असेल. भारतीय जनता पक्षाच्या वतीने भांडूप येथील एल. बी. एस. मार्गावरील सरदार तारा सिंग सभागृहात जिल्हा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सभागृह हाऊसफुल्ल झाले होते. यावेळी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रचाराचा एक प्रकारे शुभारंभ झाला असेच काहीतरी कार्यक्रमात होते. या सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधन करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री प्रकाश मेहता, आमदार सरदार तारा सिंग, आमदार राम कदम, मनोज कोटक, प्रवीण छेडा व पक्षाचे विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.