ठाणे - सचिन वझे यांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबीयांना आता कुठे विश्वास निर्माण झाला आहे. मात्र अजूनदेखील कुटुंबीयांच्या मनात भीती आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा द्यावी. त्यामुळे आम्ही सरकारवर दबाव आणत आहोत. यामध्ये अजून सिनियर पोलीस अधिकारी यांचा सहभाग आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. त्यांनी आज तिसऱ्यांदा मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तब्बल दीड तास ही बैठक सुरू होती. या बैठकीनंतर त्यांनी हिरेन यांच्या कुटुंबीयांना केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली. तसेच याबाबत गृहमंत्र्यांनादेखील संदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - 'गृहमंत्री अनिल देशमुख व पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सुद्धा हकालपट्टी करा'
'परमबीर सिंग यांची तत्काळ हकालपट्टी करा'
मनसुख यांच्या कुटुंबीयांच्या काय भावना आणि अपेक्षा आहेत, त्यादेखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितल्या. एनआयए यांनी वझे यांना अटक केल्यानंतर कुटुंबीयांना थोडा दिलासा मिळाला असला तरीदेखील या प्रकरणाची केंद्रीय संस्थेकडून चौकशी व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. तसेच हे प्रकरण शांत झाल्यानंतर मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांपासून आम्हाला धोका असल्याचेदेखील त्यांना कुटुंबीयांनी सांगितले. दुसरीकडे सोमैया यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तत्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी केली. या प्रकरणात त्यांचादेखील सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला. शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा - किरीट सोमैया मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आयकर विभागात तक्रार करणार
'एनआयएवर विश्वास'
सचिन वझे यांची परत पोस्टिंग कशासाठी, असा सवाल कुटुंबीयांच्या मनात आहे. यामध्ये आयपीएस लॉबी आहे. एनआयएवर त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास आहे, असे ते यावेळी म्हणाले.
'जीव कापणारे सरकार'
वीज दराबाबत जनतेची फसवणूक करणारे हे सरकार आहे. अजित पवार विधानसभेत अगोदर वेगळे बोलले, नंतर वीजबिल कापण्याचे काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.