मुंबई - किरीट सोमैया यांनी अनिल परब यांच्या विरोधात ट्वीट ( BJP Leader kirit somaiya tweet on anil parab ) केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, की 'अनिल परब साहेब आयकर चे म्हणणे आहे की कोट्यावधी रुपये रिसॉर्टच्या बांधकामासाठी रोख खर्च झाले. कुठून आले? वसुली वाझेची की खरमाटे ची'. असे ट्वीट करून किरीट सोमैया यांनी अनिल परब यांना सवाल केला आहे.
-
Mr Anil Parab
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Income Tax says that crores of rupees were spent in CASH on construction of Resort
Where did it come?
Vasuli by Vaze or Kharmate?
अनिल परब साहेब आयकर चे म्हणणे आहेकी कोट्यावधी रुपये रिसॉर्टच्या बांधकामासाठी रोख खर्च झाले.
कुठून आले?
वसुली वाझेची की खरमाटे ची pic.twitter.com/z7pZhFlipA
">Mr Anil Parab
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 18, 2022

वसुली वाझेची की खरमाटे ची pic.twitter.com/z7pZhFlipAMr Anil Parab
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 18, 2022
Income Tax says that crores of rupees were spent in CASH on construction of Resort
Where did it come?
Vasuli by Vaze or Kharmate?
अनिल परब साहेब आयकर चे म्हणणे आहेकी कोट्यावधी रुपये रिसॉर्टच्या बांधकामासाठी रोख खर्च झाले.
कुठून आले?
वसुली वाझेची की खरमाटे ची pic.twitter.com/z7pZhFlipA
'26 मार्च, चलो दापोली!' - सोमैयांचे ट्वीट
केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई संशयास्पद असल्याचा आरोप आघाडी सरकारकडून केला जात होता. भाजपनेते किरीट सोमय्या यांनी '26 मार्च चलो दापोली', अनिल परब रिसॉर्ट तोडू या', असे ट्विट करत या संशयाला जागा निर्माण करून दिली आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर संशय बळावल्याचे बोलले जात आहे.
रिसॉर्टवर कारवाईपुर्वीच सोमैयांच्या ट्वीटने संशय -
महाविकास आघाडी सरकार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने आघाडीतील नेत्यांवर कथित भ्रष्टाचाराचा आरोप करत, केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी मागणी करतात. मात्र, तपास यंत्रणाकडून चौकशी सुरू होण्यापूर्वीच भाजप नेत्यांकडून कारवाईचे संकेत दिले जातात. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देखील केंद्रीय तपासणी यंत्रणेच्या कारवाईवर संशय व्यक्त केला होता. केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणारी कारवाई ठीक आहे. परंतु, केंद्रातील सत्तारूढ पक्षाचे सदस्य कारवाई होण्यापूर्वी भाकीत करत असल्याने यंत्रणांची कारवाई योग्य की अयोग्य याकडे बघण्याचा संशय बळावत असल्याचे म्हटले होते. आता किरीट सोमैया यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्ट तोडण्या संदर्भात तारखेसहित केलेल्या ट्वीटमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यापूर्वी अनिल परब यांच्याकडे रिसॉर्टसाठी कोट्यवधी रुपये कुठून आले? असा सवाल केला होता.
हेही वाचा - Embarrassing And Shocking : कोवळ्या कळीला बाप,भाऊ, आजोबा मामानेही सहा वर्षे उपभोगले