ETV Bharat / city

Kirit Somaiya Mumbai : 'हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी याला फरार घोषित करा' - हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी प्रकरण

हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी ( Hawala King Nandkishore Chaturvedi ) हे सध्या फरार आहेत. नंदकिशोर चतुर्वेदी याचे आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray Company transaction ) बरोबर कंपनीचे व्यवहार आहेत. आता त्याला फरार घोषित करावे, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमैया ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी केली आहे.

किरीट सोमैया
किरीट सोमैया
author img

By

Published : Apr 15, 2022, 4:17 PM IST

Updated : Apr 15, 2022, 5:22 PM IST

मुंबई - भाजपा नेते किरीट सोमैया यांनी आज (शुक्रवारी) पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्यावर आरोप केले आहेत. हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी ( Hawala King Nandkishore Chaturvedi ) हे सध्या फरार आहेत. नंदकिशोर चतुर्वेदी याचे आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray Company transaction ) बरोबर कंपनीचे व्यवहार आहेत. आता त्याला फरार घोषित करावे, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमैया ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी केली आहे. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'नंदकिशोर चतुर्वेदीला फरार घोषित करा' : नंदकिशोर चतुर्वेदी हे मागील १५ दिवसांपासून फरार आहेत. आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांचे कंपनीचे व्यवहार होते. त्याचबरोबर श्रीधर पाटणकर यांच्याकडे सुद्धा त्यांचे येणे जाणे होते. या सर्व प्रकरणांमध्ये ते आता कुठे लपुन बसले आहेत, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे किरीट सोमैया म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांना फरार घोषित कराव, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

श्रीधर पाटणकरांचा अजून एक घोटाळा? : उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचा एक नवीन घोटाळा समोर आला आहे. श्री जी होम्स नावाने ही कंपनी आहे. याचे मालक श्रीधर पाटणकर व अन्य २ कंपन्या आहेत. शिवाजी पार्क येथे त्यांनी एका इमारतीचे निर्माण केले आहे. त्यांच्या खात्यात २९ कोटी ६२लाख २९ हजार ३२० रुपये जमा झालेले आहेत. हे पैसे मनी लॉन्ड्रिंगद्वारे खात्यामध्ये जमा झालेले आहेत. या कंपनीचे कार्यालय मुंबईत वांद्रे येथे असून हे पैसे कुठून आले याचे उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असेही किरीट सोमैया म्हणाले.

प्रवीण कलमे कुठे आहेत? : मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे मित्र प्रवीण कलमे हे सध्या फरार आहेत. प्रवीण कलमे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एसआरए कार्यालयामध्ये जाऊन तेथील कागदपत्र चोरल्या प्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रवीण कलमे व जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे संबंध होते. याविषयी मी फार पूर्वी आवाजही उठवला होता. परंतु तेव्हा मला दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आता प्रवीण कलमे यांच्यावर १ एप्रिल २०२२ रोजी गुन्ह्याची नोंद झाली असून मागील १५ दिवसांपासून ते फरार आहेत. त्यांचा थांगपत्ता लागत नाही, म्हणून प्रवीण कलमे यांना परदेशात तर पाठवलं नाही ना? जर हे परदेशात गेले असतील, तर ते कोणाच्या परवानगीने परदेशात गेले? त्यांना परदेशात कोणी पाठवलं? याचीसुद्धा शहानिशा करण्याची मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे.

हेही वाचा - Sanjay Raut Allegation : INS विक्रांत नंतर सोमय्यांची आता 'टॉयलेट एक लव्ह स्टोरी'

Last Updated : Apr 15, 2022, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.