ETV Bharat / city

Ashish Shelar Meet Sharad Pawar : एमसीए निवडणुकीसाठी आशिष शेलार पोहोचले शरद पवारांच्या भेटीला

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 28 सप्टेंबरला पार पडणार आहे. भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेटीसाठी ( Ashish Shelar meeting Sharad Pawar ) पोहोचले. एमसीएच्या होणाऱ्या निवडणुकी संदर्भात या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती मिळत ( Bjp Leader Ashish Shelar meeting for MCA elections ) आहे.

Bjp Leader Ashish Shelar meeting  Sharad Pawar
आशिष शेलार पोहोचले शरद पवारांच्या भेटीला
author img

By

Published : Sep 13, 2022, 11:59 AM IST

मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 28 सप्टेंबरला पार पडणार आहे. त्याआधी आज एमसीएची सर्वसाधारण सभा आज सायंकाळी पार पडेल. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांच्या राजकीय गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेटीसाठी ( Ashish Shelar meeting Sharad Pawar ) पोहोचले. एमसीएच्या होणाऱ्या निवडणुकी संदर्भात या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती मिळत ( Bjp Leader Ashish Shelar meeting for MCA elections ) आहे.

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी गाठीभेटीचे सत्र एमसीएच्या या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आपली ताकद पणाला लावणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष विरोधात शरद पवार आणि आदित्य ठाकरे, असे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र एमसीएची निवडणूक समन्वयाने पार पाडावी यासाठी आशिष शेलार यांच्याकडून पुढाकार घेतला जात असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या गटाकडून क्रिकेटपटू संदीप पाटील यांना पाठिंबा दिला जातोय. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमोल काळे यांना पाठिंबा दिला जातोय. त्यामुळे एमसीएच्या अध्यक्षपद नेमकं कोणत्या गटाकडे जाणार याबाबतची चर्चा सुरू आहे. मात्र त्याआधी गाठीभेटीचे सत्र सुरू झाले असून आशिष शेलार ( Bjp Leader Ashish Shelar ) या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी थेट शरद पवार यांच्या घरी दाखल झाले आहेत.

प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना पहिल्या नंतर आशिष शेलार माघारी फिरले तसेच कालही आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या घरी जाऊन या निवडणुकीबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र तेथे असलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना पहिल्या नंतर आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या घरी न जाता मागे फिरले. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी यावेळी पाच नाव चर्चेत आहेत. संदीप पाटील अमोल पाटील विजय काळे नवीन शेट्टी आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

एमसीएचे निवडणुकीत शिवसेना एकटी पडण्याची शक्यता एमसीएचे निवडणुकीमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात सामंजस्य झाले. तर, या निवडणुकीमध्ये शिवसेना एकटी पडण्याची शक्यता आहे. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेची मिलिंद नार्वेकर हे देखील रिंगणात असणार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांनी मिळून ही निवडणूक लढवल्यास शिवसेना एकटी पडण्याची शक्यता आहे. ( MCA elections in Mumbai )

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.