मुंबई - राज्यात महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला संपवले असून; शिवसेना पक्ष आता चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. आता तरी शिवसेनेने डोळे उघडावे (NCP and Shiv Sena) आणि एकनाथ शिंदे यांचे बंड किती योग्य होते हे स्पष्ट झाले, अशी टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar criticized) यांनी आज मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषदेत दरम्यान केली. Adv. Ashish Shelar
19 सप्टेंबर मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. या निकालांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर दिसून येत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. तर लोकांकडून शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती मिळत आहे, त्यामुळे शिंदे यांचे बंड योग्यच होते, असा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला संपवले : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसने संपवले असून; ही गोष्ट सत्य असल्याचे आताच्या आकड्यांवरून समोर आले आहे. एकनाथ शिंदे जे वारंवार सांगत होते, त्यात तथ्य असल्याचे समोर आले आहे. आता तरी शिवसेनेचे डोळे उघडतील असेही शेलार यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात जनतेने भाजपला भरभरून प्रतिसाद दिला; याबद्दल राज्यातील जनतेचे आपण आभारी आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी चौकशीला सामोरे जावे : माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी आपण मंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी शंभर कोटी रुपयांचा निधी पळवल्याचा गंभीर आरोप केला आहे. रामदास कदम यांचा हा आरोप अतिशय गंभीर असून त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने केलेल्या आरोपाची गंभीर दखल घेण्यात यावी. त्यांना आदित्य ठाकरे यांच्या बाबत नक्कीच अधिक माहिती असणार, त्यामुळे याबाबत आदित्य ठाकरे यांनी स्वतःहून चौकशीला सामोरे जावे असे आव्हानही शेलार यांनी केले आहे.
गणेशोत्सव मंडळांचा सत्कार : भारतीय जनता पक्षाच्या वतीने गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 1026 गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला. यापैकी 67 मंडळांना अंतिम यादीत स्थान देण्यात आले असून; त्यापैकी 21 मंडळांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. हा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी मुंबईतील शिवाजी मंदिर येथे होणार असून; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठी परंपरा आणि संस्कृती जपणारे ख्यातनाम गायक व गायिका यांचा सदाबहार कार्यक्रम तसेच नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. Adv. Ashish Shelar