ETV Bharat / city

'पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड'

याप्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या पुराव्यांची तपासणी होण्याची मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

bjp leader ashish shelar
bjp leader ashish shelar
author img

By

Published : Mar 17, 2021, 3:16 PM IST

मुंबई - पूजा चव्हाण प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लिप सांताक्रुज येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या, त्यामध्ये छेडछाड करण्यात येते की काय, तसेच मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदन अहवालात ही छेडछाड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने या पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना केली.

हेही वाचा - 'त्या' मर्सिडिज सोबत भाजप पदाधिकाऱ्याचा फोटो; सचिन सावंतांनी मागितला खुलासा

हेही वाचा - अँटिलिया प्रकरण: एनआयएकडून आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांना आज होवू शकते अटक

'स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी व्हावी'

शेलार म्हणाले, की ठाकरे सरकारची हेराफेरी सुरुच आहे. रोज नवीन हेराफेरी या ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जात आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे प्रकरण उघड झाले. त्याचा फायदा घेत राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लीप ज्या सांताक्रूझ येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या, त्यामध्ये छेडछाड सुरू आहे की काय, तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच, असे अहवाल तयार होण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता आहे. तसेच मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल तसेच शवविच्छेदन करतानाचे रेकॉर्डिंग पोलिसांना पूर्णपणे देण्यात आलेले नाही. त्यामध्येही छेडछाड केली जाते आहे की काय, अशी शंका आहे. त्यामुळे याप्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या पुराव्यांची तपासणी होण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.