ETV Bharat / city

मंत्री धनंजय मुंडेंविरोधात भाजप आक्रमक, मुंबईत चित्रा वाघ यांचे आंदोलन

बलात्काराच्या आरोपांमुळे वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरात भाजप महिला मोर्चाकडून सोमवारपासून तीव्र आंदोलन केले जात आहे. मुंबईत भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात मुंडेंविरोधात आंदोलन करण्यात आले. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.

author img

By

Published : Jan 18, 2021, 1:28 PM IST

मुंबई - बलात्काराच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या महिला मोर्चाकडून मुंबईत धनंजय मुंडेंविरोधात आंदोलन करण्यात आले. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.

हेही वाचा - कोणीही आरोप करावा आणि त्यावर निर्णय घ्यावा, अशी परिस्थिती नाही - शरद पवार

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. सामाजिक न्याय या सारखे खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीवर एका महिलेकडून झालेले आरोप पाहता धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. एखाद्या महिलेने कॅबिनेट मंत्र्यावर आरोप करणे हे गंभीर आणि धक्कादायक आहे. राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणत्याही दबावाला बळी न पडता तपास केला पाहिजे. मुलीनं केलेल्या आरोपामध्ये काही जर तथ्य असेल आणि धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणं शिक्षा व्हावी, असंही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - 'तक्रार दाखल करून घेतली नाही तर सोमवारी रेणू शर्मा जाणार न्यायालयात'

मंत्रीपदावरील व्यक्तीच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह

मंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीने आपल्या दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे. पहिल्या पत्नीच्या संमतीनेच आपण सदर महिलेशी संबंध ठेवले, तिच्यापासून झालेल्या मुलांना आपले नाव दिले, याची कबुलीही मुंडे यांनी दिली आहे. मंत्रीपदावरील व्यक्ती अशा पद्धतीचे वर्तन करत असेल तर त्यातून समाजाला काय संदेश जातो आहे, याचा विचार करावाच लागणार आहे असं भाजप नेत्या उमाताई खापरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा - आरोप प्रत्यारोपांच्या भडीमारानंतरही धनंजय मुंडे यांचे कामकाज सुरूच

राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मुंडे यांच्या विरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धडपड ती महिला करत आहे. मुंडे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरूप पाहता व या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे महिला मोर्चाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे.

हेही वाचा - धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही - गुलाबराव पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.