ETV Bharat / city

BJP Offer to Eknath Shinde : भाजपकडून एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर, १० कॅबिनेट, ५ राज्यमंत्री पदे आणि केंद्रातही देणार वाटा? - Maharashtra Political Crisis

एकनाथ शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर देण्यात आली असल्याची चर्चा आहे. राज्यात सध्या शिवसेनेकडे उप मुख्यमंत्रीपदासह १० कॅबिनेट व ४ राज्यमंत्री पद आहेत. त्या अनुषंगाने आता शिंदे गटाला राज्यात १० कॅबिनेट मंत्रिपदे आणि ५ राज्यमंत्रीपदे, शिंदे यांना देण्याची ऑफर भाजपकडून देण्यात आल्याचे सांगितले जातेय. तसेच केंद्रात २ मंत्रीपद देण्याची तयारीही भाजपने दर्शवली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ( BJP Give Big offer to Eknath shinde )

BJP Offer to Eknath Shinde
भाजपकडून एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर
author img

By

Published : Jun 23, 2022, 5:47 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात सर्वात महत्त्वाची घडामोड सध्या सुरु आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला बरोबर घेऊन राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी भाजप तयारीत आहे. हे सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे यांना व त्यांच्या गटाला मंत्रिपदाच्या मोठ्या ऑफर देऊ केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ( BJP Give Big offer to Eknath shinde )

शिंदे यांच्याकडे ४६ आमदारांचे समर्थन? - एकनाथ शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर देण्यात आली असल्याची चर्चा आहे. राज्यात सध्या शिवसेनेकडे उप मुख्यमंत्रीपदासह १० कॅबिनेट व ४ राज्यमंत्री पद आहेत. त्या अनुषंगाने आता शिंदे गटाला राज्यात १० कॅबिनेट मंत्रिपदे आणि ५ राज्यमंत्रीपदे, शिंदे यांना देण्याची ऑफर भाजपकडून देण्यात आल्याचे सांगितले जातेय. तसेच केंद्रात २ मंत्रीपद देण्याची तयारीही भाजपने दर्शवली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. एकनाथ शिंदे गटाचा विचार केल्यास, शिंदे यांच्याकडे ३७ आमदार आणि ९ अपक्ष असे एकूण ४६ आमदारांचे संख्याबळ असल्याचे बोलले जातंय. तसे संख्याबळ सुद्धा त्यांनी राज्यपाल यांना दाखवण्यासाठी हॉटेलमधील आमदार समर्थकांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला आहे.

भाजप घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन? - दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक विधान केलेय. हे विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. तुम्ही परत या, गरज वाटल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडू, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. या वक्तव्यावरून सुद्धा आता शिंदे समर्थक आमदार संभ्रमात आहेत. तर दुसरीकडे राऊत यांच्या या वकतव्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचे संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी २०१९ मध्ये स्थापन केलेल्या ८० तासांच्या सरकारमध्ये अजित पवारांना असलेली ऑफरच शिंदेंना भाजपने दिल्याची माहिती समोर येत आहे. परंतु या सर्व घडामोडी होत असताना आता शिंदे गटातील आमदारांची एकजूट कायम राहणार की त्यात फूट पडणार? याकडेही सर्वांसोबत भाजपचेही बारकाईने लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Sanjay Raut Appeal to Eknath Shinde : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, तुम्ही 24 तासांत मुंबईत दाखल व्हा - राऊतांचे शिंदेंना आवाहन

हेही वाचा - Radisson Blu Hotel in Guwahati : एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हा रे साथ है, 42 बंडखोर आमदारांचा फोटो बाहेर

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : बंडखोरीनंतरही हे 13 निष्ठावंत आमदार आहेत उद्धव ठाकरेंसोबत, वाचा काय आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.