ETV Bharat / city

राज्यसभेच्या 'त्या' जागेसाठी भाजपाकडून संजीव उपाध्याय यांचा अर्ज दाखल

4 ऑक्‍टोबरला या 1 जागेसाठी निवडणूक होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी या निवडणुकीचा निकाल लावला जाणार आहे. संजय उपाध्याय यांचा अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपा उमेदवाराच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. पुरेसे संख्याबळ नसतानाही लोकशाहीमध्ये काहीही होऊ शकते, असे म्हणत विरोधी पक्षांमध्ये खळबळ माजवण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

संजीव उपाध्याय अर्ज
संजीव उपाध्याय अर्ज
author img

By

Published : Sep 22, 2021, 3:17 PM IST

Updated : Sep 22, 2021, 3:28 PM IST

मुंबई - राज्यसभा काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेवरील जागेसाठी मतदान होणार असून भारतीय जनता पक्षाकडून संजय रामभक्त उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज आज (बुधवारी) विधान भवनात भरण्यात आला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित होते. 4 ऑक्‍टोबरला या 1 जागेसाठी निवडणूक होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी या निवडणुकीचा निकाल लावला जाणार आहे. संजय उपाध्याय यांचा अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपा उमेदवाराच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. पुरेसे संख्याबळ नसतानाही लोकशाहीमध्ये काहीही होऊ शकते, असे म्हणत विरोधी पक्षांमध्ये खळबळ माजवण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

राज्यसभेच्या 'त्या' जागेसाठी भाजपाकडून संजीव उपाध्याय यांचा अर्ज दाखल

निलंबित बारा आमदारांना मतदानाचा अधिकार

पावसाळी अधिवेशनात गैरवर्तनामुळे भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर बारा आमदारांना मतदानाचा अधिकार बजावता येणार असून या आमदारांना मतदान करण्यासाठी विधानभवनाच्या बाहेर वेगळ मतदान केंद्र उभारले जाणार आहे. त्यामुळे बारा आमदारांना मतदान करता येणार नाही यासाठी खूश होणाऱ्या आघाडी सरकारला आपल्या आनंदावर विरजण घालावे लागेल, असा चिमटाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी काढला.

'राजू सातव यांच्या पत्नीला उमेदवारी दिली नाही'

दुर्दैवाने राज्यातील एखादा आमदार किंवा खासदार याचा मृत्यू झाल्यास त्याजागी त्या आमदाराच्या किंवा खासदाराच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाते, अशी महाराष्ट्राची राजकीय परंपरा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यानुसार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाईल, अशी आशा होती, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी संजीव उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर केला आहे. राजीव सातव हे भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्या पत्नीला उमेदवार म्हणून घोषित केले असते तर भारतीय जनता पक्षाने वेगळा विचार केला असता. मात्र काँग्रेसकडून इतर उमेदवार दिला गेला. राजकीय परंपरेबाबत आपण शरद पवार यांना सल्यूट करतो. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील त्यांच्या पत्नींना उमेदवारी दिली होती, अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी करुन दिली.

हेही वाचा - तुमची-माझी बरोबरी होत नाही; संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचा पत्रातून टोला

Last Updated : Sep 22, 2021, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.