ETV Bharat / city

Muncipal Election : भाजपचे मिशन मनपा निवडणुका, मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी शिवसेनेत विभागणी

एकनाथ शिंदेंना भाजपने मुख्यमंत्रीपदी ( CM Eknath Shinde ) बसवले आहे. त्यानंतर आता शिवसेनेत विभागणी करण्याच्या हालचाली ( Division Of Shivsena ) सुरु झाल्या आहेत. त्यानंतर शिवसेनेत विभागणी झाल्यास, त्याचा फायदा मनपा निवडणुकीत ( Muncipal Election ) भाजपला ( Bjp ) होणार आहे.

author img

By

Published : Jul 1, 2022, 7:52 PM IST

eknath shinde uddhav thackeray
eknath shinde uddhav thackeray

मुंबई - मुंबईसह शिवसेनेच्या ( Shivsena ) ताब्यात असलेल्या महापालिकेवर ( Muncipal Election ) सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकीत शिवसेनेला पराभूत करणे, सोपे व्हावे यासाठी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) पदी वर्णी लावण्यात आली आहे. तसेच, शिवसेनेची विभागणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या ( Division Of Shivsena ) आहेत. मतदार संभ्रमात पडल्यास मनपा निवडणुकीत त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला होईल, ही या मागची खेळी असल्याचे बोलले जाते.

भाजपने संधी साधत एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केले - नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत ३९ आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठली. भाजपशासित सत्ता असलेल्या गुजरात, आसाम आणि गोवा राज्यात ठाण मांडून, हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत महाविकास आघाडी ( Mahavikad Aghadi ) तोडून भाजपसोबत युती करण्याची मागणी शिंदे यांच्या गटाने केली. शिंदे गटाच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shivsena Leader Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. भाजपने ही संधी साधत सत्तास्थापनेचा दावा केला. तसेच शिवसेना बंडखोर आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले.

शिवसेनेच्या ताब्यातील पालिका जिंकण्याचा इरादा - मुंबई महापालिकेची सत्ता २५ वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेला ती सर्वाधिक महत्त्वाची आहे. भाजप-सेनेच्या नगरसेवकांच्या आकड्यातील फरक गेल्या वेळी कमी होता. आता केंद्र आणि राज्यात सत्ता मिळवल्यानंतर सोन्याची अंडे देणारी मुंबई महापालिका काबीज करायची तयारी भाजपने सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महापालिका जिंकायच्या, असा इरादा भाजपने केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरले आहे.

एकनाथ शिंदे यांचा मुंबईसोडून राज्यात दबदबा - कोकण, मुंबईसह नऊ महापालिका, २२ नगरपरिषदा, २१ नगरपंचायती आहेत. यातील बहुतांश ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. येथील शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री पद देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई वगळता इतर जिल्ह्यात चांगला दबदबा आहे. तसेच, शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त शिवसेना निर्माण करण्यासाठी भाजपने शिंदे गटाच्या आडून प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जाते. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आमची असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. 'बाळासाहेब ठाकरे- शिवसेना' असे नामकरण करून न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. शिवसेनेत पडलेल्या दोन गटामुळे मतदार चांगलेच संभ्रमात पडणार आहेत.

'शिवसेनेला बसणार फटका' - एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्री पदावर बसवले आहे. मुंबई मनपा वगळता ठाणे जिल्ह्यातील कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, मीरा भाईंदर आदी भागात एकनाथ शिंदे यांचा एक वलय आहे. या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे. या ताकदीला भाजपकडे असलेल्या उत्तर भारतीय आणि हिंदुत्व मतांचा बेस जोडला आहे. शिंदेंसेना आणि भाजप यांच्या एकत्रित युतीमुळे, तसेच ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री हे सर्वोच्च पद असल्याने येथील विकासकामे, नगरविकासाच्या कामांचा आशावाद निर्माण झाल्यामुळे आगामी काळात शिवसेनेला याचा निश्चित फटका बसेल, असे मत वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजय मिस्कीन यांनी मांडले. स्थानिक पातळीवरही दुफळी झाल्याने याचे परिणाम, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या समस्येचे एकनाथ शिंदे यांना असलेल्या अनुभवामुळे शिवसेनेला आगामी निवडणुका फार जड जातील, असेही मिस्किन म्हणाले.

हेही वाचा - Rahul Narvekar : भाजपचा पुन्हा नवीन डाव, शिवसेनेमधून आलेल्या राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.