ETV Bharat / city

MNS Hindu Politics : शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने मनसेला पुढे आणले? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचे मत

author img

By

Published : Apr 18, 2022, 8:39 PM IST

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आगामी काळात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने ( Bhartiya Janta Party ) मनसेला पुढे आणले. मनसेनेही इंजिनला मराठीवरून आता थेट हिंदुत्वाचा ( MNS Hindu Politics ) डब्बा जोडला. परंतु, राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या आजवरच्या बदलत्या भूमिकेमुळे बिगर मराठी भाषिक मनसेचे हिंदुत्व स्वीकारतील का? हा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, मतदारांनी साथ न दिल्यास भाजपची खेळी मनसेला डोईजड ठरण्याची शक्यता आहे.

Bhartiya Janta Party
Bhartiya Janta Party

मुंबई - हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आगामी काळात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने ( Bhartiya Janta Party ) मनसेला पुढे आणले. मनसेनेही इंजिनला मराठीवरून आता थेट हिंदुत्वाचा ( MNS Hindu Politics ) डब्बा जोडला. परंतु, राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या आजवरच्या बदलत्या भूमिकेमुळे बिगर मराठी भाषिक मनसेचे हिंदुत्व स्वीकारतील का? हा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, मतदारांनी साथ न दिल्यास भाजपची खेळी मनसेला डोईजड ठरण्याची शक्यता आहे.

बाबरी मशीद पडल्यानंतर भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यासाठी देशव्यापी राहती यात्रा काढली. आयोध्या त्यानंतर चर्चेत आले. २०१४ नंतर झालेल्या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत राम मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा गाजला. २०१९ मध्ये भाजपने शिवसेनेला सत्ता स्थापनेवेळी डावलून अजित पवार यांच्यासोबत घरोबा करत सरकार बनवले. भाजपला चपराक देण्यासाठी शिवसेनेने धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत युती केली. हातून सत्ता गेल्याचे शल्य भाजपच्या जिव्हारी लागले. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी असल्याचे दाखवण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

शिवसेनेला नमवण्यासाठी मनसे पुढे - शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. गेल्या वीस पंचवीस वर्षापासून शिवसेनेचे राजकारण हिंदुत्वाभोवती फिरत आहे. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत युती केल्याने भाजपकडून स्वतः कट्टरवादी हिंदुत्व भासवले जात आहेत. तसेच शिवसेनेच्या हिंदुत्वावर सातत्याने प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी, भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे. आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्व नाही. तसेच आमचे हिंदुत्व राष्ट्रीय असून शेंडी आणि जाणव्याचे हिंदुत्व नाही, असे सांगत भाजपच्या हिंदुत्वाची हवाच काढत आहेत. वारंवार भाजपच्या हिंदुत्वावर शिवसेनेकडून आसूड ओढण्यात येऊ लागल्याने शिवसेनेला नमवण्यासाठी भाजपने मनसेला पुढे आणले आहे.

महाराष्ट्रात राजकारण तापले - राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून भगव्या कपड्यांमध्ये वावरताना दिसतात. नुकतेच ५ मेला अयोध्येला जाण्याची घोषणा करत वातावरण निर्मिती केली. त्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज यांच्या दौऱ्यापूर्वी आयोध्याला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला आहे. मुळात, शिवसेनेचे राजकारण आजपर्यंत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चालले. तर राज ठाकरे हिंदू विचारधारेतून उदयास आलेले नेतृत्व आहे. मनसेला सोबत घेऊन भाजप आपला अजेंडा राबवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच सध्या हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा प्रकर्षाने गाजतो आहे. सध्या देशासह महाराष्ट्रात यावरून राजकारण तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने मनसेचा पर्याय ठेवला आहे. मनसेची आजपर्यंतची भूमिका सातत्याने बदलत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार मनसेला स्वीकारतील याबाबत साशंकता आहे.

मतदारांवर परिणाम होणार? - भाजप आणि शिवसेनेचा पूर्वीपासूनच हिंदुत्वाचा अजेंडा आहे. सध्या राज ठाकरे हा अजेंडा राबवताना दिसतात. परंतु मनसेच्या स्थापनेपासून राज यांची भूमिका सातत्याने बदलत आली आहे. सेनेचा मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून राज ठाकरे यांनी राजकारणात एन्ट्री केली. दुसरीकडे भाजपच्या हिंदुत्ववादी विचारा विरोधात लोकसभा, राज्यसभा निवडणुकीत परखड भूमिका मांडली. सध्या मराठीचा मुद्दाकडून हिंदुत्त्वाचा अजेंडा मनसे राबवत आहे. परंतु, मतदार प्रगल्भ झाले असून सोयीप्रमाणे बदलणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेविरोधात जातील. मनसेच्या हिंदुत्वाच्या अजेंडाचा मतदारांवर कोणताही परिणाम होणार नाही. मराठीचा मुद्दा घेऊनही मनसेला आजपर्यंत अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नव्हते. उलट शिवसेनेने आता धर्मनिरपेक्ष पक्षांशी युती केल्याने घटनेला प्रमाण मानून व्यापक होत आहे. त्यामुळे संविधान, सेक्युलर विचारसरणीची लोक शिवसेनेकडे वळतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फटका बसेल या शिवाय भाजपलाही बसू शकतो, असे मत राजकीय विश्लेषक त्यात वरिष्ठ पत्रकार मधु कांबळे यांनी व्यक्त केले.

'भाजपला मनसेचा अजेंडा पोषक' - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत भाजपने मनसेला सोबत घेतले आहे. मुंबईत उत्तर भारतीय मतांची विभागणी व्हावी, त्याचा फायदा भाजपला व्हावा यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राजकारण सुसंस्कृत विचारसरणीवर चालते. औरंगाबाद शहरात धार्मिक ध्रुवीकरणवर निवडणुका होतात. अशा ठिकाणी मात्र भाजपला मनसेचा अजेंडा पोषक ठरेल. लोकसभा, राज्यसभेच्या निवडणुका धार्मिक मुद्द्यावर होतात. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर होतात. त्यामुळे आगामी हिंदुत्वाच्या मुद्द्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे निरीक्षण वरिष्ठ पत्रकार संजय मिस्कीन नोंदवतात.

हेही वाचा - Raj Thackeray Threat Call : राज ठाकरेंना धमकीचे फोन, Z+ सुरक्षा देण्याची मनसेची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.