मुंबई - शिवसेनेला कोंडीत पकडायचे असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला धक्का देणे गरजेचे आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला भाजप लागलेली आहे. याबाबत विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एक महत्वाची बैठक आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावली होती. या बैठकीला विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, आमदार प्रसाद लाड यांच्यासहित इतरही नेते उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी सुरू केलेले "समर्थ बूथ मोहीम" याबाबतही या बैठकीत चर्चा झाली असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर.. 'समर्थ बूथ अभियाना'साठी फडणवीसांची बैठक
शिवसेनेला कोंडीत पकडायचे असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला धक्का देणे गरजेचे आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला भाजप लागलेली आहे. याबाबत विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एक महत्वाची बैठक आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावली होती.