ETV Bharat / city

मुंबई महानगरपालिका प्रभाग रचनेत घोळ झाल्याचा भाजपाचा आरोप; शिष्टमंडळांने घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

author img

By

Published : Oct 30, 2021, 8:31 AM IST

Updated : Oct 30, 2021, 9:22 AM IST

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली असताना यासाठी बनवण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर भाजपने हरकत घेतली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला आहे, असे सांगत भाजप शिष्टमंडळाने निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांची भेट घेतली.

bjp delegation met with Election Commissioner

मुंबई - पुढल्या वर्षी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली असताना यासाठी बनवण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर भाजपने हरकत घेतली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला आहे, असे सांगत भाजप शिष्टमंडळाने निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार भाजप नेते आशिष शेलार, आमदार भाजप नेते अतुल भातखळकर, आमदार अमित साटम यांचा समावेश होता.

प्रतिक्रिया

नियमांची पायमल्ली केली गेली -

मागील तीस वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजप पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरली आहे. तरी दुसरीकडे महा विकास आघाडी विशेषता शिवसेना कुठल्याही परिस्थितीत आपली सत्ता कायम टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. या निवडणुकीसाठी पहिला महत्त्वाचा मुद्दा होता तो प्रभाग रचना. ही प्रभाग रचना बनवत असताना शिवसेनेने प्रथा, परंपरा कायदा, नियमावली याला पायदळी तुडवलं असल्याची टीका अशिष शेलार यांनी केलेली आहे. पालिकेत स्वतःचा पराभव टाळण्यासाठी शिवसेना शेवटची फरफट करत असून कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा पराभव अटळ आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

अधिकाऱ्यांनाही माहिती नाही -

प्रभाग रचनेचा जो कच्चा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर नेला होता. त्याची निर्मिती मुंबई महापालिकेच्या कुठल्याही विभागातून झालेली नाही. सर्वसाधारण पणे ती कर निर्धारण विभाग, विकास नियोजन विभाग, अग्निशमन दल विभाग इथून होते. परंतु या प्रस्तावाबाबत आयएस अधिकाऱ्यांनाही याची माहिती नव्हती, असेही अशिष शेलार यांनी सांगितले आहे. आयुक्तांच्या कार्यालयात बुलेट ट्रेनच्या वेगाने हा प्रस्ताव गेला व तिथे सर्व अधिकाऱ्यांना बोलावून रिकाम्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन नंतर हा प्रस्ताव निवडणूक आयुक्ताकडे पाठवला असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

सीसीटीव्ही फूटेज जाहीर करा -

याप्रकरणी हिंमत असेल तर पालिका आयुक्तांच्या दालनात शिवसेनेचे कुठले नेते गेले. सचिवांच्या कार्यालयात कुठले नेते गेले. याचे 23 ऑक्टोंबर पासूनचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे, असे आव्हानही अशिष शेलार यांनी केले आहे. यासर्व प्रकरणी भाजप शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांची भेट घेऊन या पूर्ण प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणात पारदर्शकता आणण्याची विनंती केली आहे. अन्यथा येणाऱ्या दिवसात भाजप निवडणूक आयुक्तांच्या दालनात आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपतर्फे देण्यात आला आहे.

हेही वाचा - अन् महेंद्रसिंह धोनी बनला भारतीय संघाचा कॅप्टन; शरद पवारांनी सांगितला किस्सा!

Last Updated : Oct 30, 2021, 9:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.