ETV Bharat / city

अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठी घोषणा - ajit pawar about electric vehicles

केंद्र सरकारने 2030पर्यंत इलेक्ट्रिकल वाहने भारतात पूर्णत: उपयोगात आणण्याची योजना आखली आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकरणामुळे दिवसागणिक रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या, त्यातून निर्माण होणारे प्रदूषण आणि पर्यावरण हानी अशा समस्या निर्माण होत आहेत.

electric vehicles in the state budget
electric vehicles in the state budget
author img

By

Published : Mar 9, 2021, 6:32 AM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारचे दुसरे अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पात गॅसचा वापर कमी करण्यासाठी तसेच शहरातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी महामार्गावर मेगा इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग सेंटर उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्यासाठी 2021-22या आर्थिक वर्षासाठी ऊर्जा विभागात 9 हजार 453 कोटी रुपये प्रस्तावित केले आहे.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन -

केंद्र सरकारने 2030पर्यंत इलेक्ट्रिकल वाहने भारतात पूर्णत: उपयोगात आणण्याची योजना आखली आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकरणामुळे दिवसागणिक रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या, त्यातून निर्माण होणारे प्रदूषण आणि पर्यावरण हानी अशा समस्या निर्माण होत आहेत. त्यामूळे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच गॅसचा वापर कमी करण्याकरिता केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पाबरोबरच आता राज्याच्या अर्थसंकल्पातही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

या तीन मार्गावर उभारणार चार्जिंग सेंटर -

शहरातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शासनाने 2018 मध्ये ई-व्हेइकलचे धोरण जाहीर केले आहे. त्यात आता कालानुरूप सुधारणा करण्यात येत असून राज्यामध्ये नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गावर मेगा इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग सेंटर स्थापन करण्यात येणार आहे.

हेही वाचा - जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं शाह यांची मोठी घोषणा; भारतीय महिला क्रिकेट संघ कसोटी सामना खेळणार

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.