ETV Bharat / city

रस्ते, पदपथ प्याऊच्या जीर्णोद्धाराचे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन - पदपथ विकासासह सौंदर्यीकरण

चर्चगेट उपनगरीय रेल्वे स्थानक ( Churchgate Suburban Railway Station ) आणि डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक ( Shamaprasad Mukherjee Chowk  ) हे दोन्ही परिसर पुरातन वास्तू परिसर आहेत. मागील काळात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक परिसरातील काही भागांचे सौंदर्यीकरणाचे काम महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण) खात्याच्या माध्यमातून करण्यात आले होते.

जीर्णोद्धाराचे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

author img

By

Published : May 2, 2022, 10:47 PM IST

मुंबई - दक्षिण मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानक परिसर ( Churchgate Railway Station Complex ) आणि डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी ( beautification of Shamaprasad Mukherjee Chowk ) रस्ते व पदपथ विकास आणि मेट्रो चित्रपटगृहालगत असलेली माधवदास लक्ष्मणदास कोठारी प्याऊचा ( Madhavdas Laxmandas Kothari Pyau ) जीर्णोद्धार या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

सौंदर्यीकरणाचे काम -चर्चगेट उपनगरीय रेल्वे स्थानक ( Churchgate Suburban Railway Station ) आणि डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक ( Shamaprasad Mukherjee Chowk ) हे दोन्ही परिसर पुरातन वास्तू परिसर आहेत. मागील काळात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक परिसरातील काही भागांचे सौंदर्यीकरणाचे काम महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण) खात्याच्या माध्यमातून करण्यात आले होते. आता रस्ते विभागाच्या माध्यमातून डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक परिसरातील सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराचे पदपथ आणि चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे दीड किलोमीटर अंतराचे पदपथ विकासासह सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या विकासामध्ये पदपथासह बस थांबे आणि रंगरंगोटीसह इतर बाबींचाही समावेश आहे. ही कामे डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

प्याऊचा होणार जीर्णोद्धार - ए विभागातील मेट्रो चित्रपटगृहालगत महात्मा गांधी मार्गावर माधवदास लक्ष्मणदास कोठारी प्याऊ ही पुरातन वास्तू श्रेणीत मोडणारी प्याऊ आहे. पूर्वी मुंबई शहरात वाटसरुंची तसेच प्राण्यांची तहान भागवण्यासाठी विविध ठिकाणी पाणपोई अर्थात प्याऊंची निर्मिती करण्यात आली होती. या प्याऊंचे संचालन धर्मादाय संस्था अथवा दात्यांकडून केले जात असे. माधवदास लक्ष्मणदास कोठारी प्याऊ ही अशीच पुरातन प्याऊ आहे. मंदिरांच्या शिखराप्रमाणे दोन नक्षीदार कमान असलेल्या या प्याऊचे शास्त्रोक्त पद्धतीने जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.

असा होणार जीर्णोद्धार- प्याऊची मूळ नक्षीदार संरचना पूर्ववत करणे, तुटलेले पुरातन भाग त्याच प्रकारच्या दगडांपासून तयार करुन पुनर्स्थापित करणे, ओतीव लोखंडांचे नक्षीदार नळ बसविणे, जलव्यवस्था पूर्ववत करुन टाकीमधून शुद्ध पाणी उपलब्ध होण्याची व्यवस्था करणे अशी निरनिराळी कामे जीर्णोद्धारात समाविष्ट आहेत. जीर्णोद्धाराचे काम येत्या ९ महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासोबत ३ वर्षे परिरक्षणाचे कामदेखील सोपविण्यात आले आहे.

विविध कामांच्या भूमीपुजन प्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, ए विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) शिवदास गुरव, माजी नगरसेवक गणेश सानप, माजी नगरसेविका सुजाता सानप यांच्यासह स्थानिक नागरिक व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा-Uniform Civil Code : केवळ मुस्लिम द्वेषातून देशात समान नागरी कायद्याची भाषा- असदुद्दीन ओवैसी

हेही वाचा-Exam Fever 2022 : सीईटी-एमएचटी परीक्षेचा वेळापत्रक जाहीर; मंत्री उदय सामंताची माहिती

हेही वाचा-Raj Thackeray Speech Controversy: मनसेकडून महाआरती रद्द, तर राज ठाकरेंवर कारवाईची अनेकांची मागणी; वाचा दिवसभरात काय घडलं?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.