मुंबई- कुटुंबातील कलह, आर्थिक समस्या, यासारख्या समस्यांनी ग्रासलेल्या महिलांना समस्येतून सुटका करण्याचे आश्वासन देऊन त्यांना आपल्या जाळ्यात ओढून शरीराची भूक भागवणाऱ्या एकाय़ भोंदूबाबाचा भांडा फोड झाला आहे. हा भोंदू बाबा मनाने त्रस्त असलेल्या भयभीत झालेल्या आणि संकटात अडकलेल्या महिलांना सावज म्हणून हेरायचा आणि त्यांच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करायचा,यातील एक पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर या भोंदच्या कांदिवली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. प्रणव शुक्ला असे या भोंदूचे नाव आहे.
कांदिवली आणि बोरिवली परिसरातल्या हाय प्रोफाईल परिसरात त्याने आपले भोंदूगिरीचा व्यवसाय थाटला आहे. मात्र, हा बाबा कशा प्रकारे भोंदुगिरी करतो आणि महिलांना आपल्या वासनेचा शिकार कसा बनवतो. याचे सगळे पितळ एका महिलेने उघड केले आहे. कांदिवली परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 2010-11मध्ये या पीडित महिलेची तिच्या पतीसोबत भांडणे होत होती. मात्र घरामध्ये होणारा कलह थांबावा म्हणून ती देव देऋृषी करण्याकडे वळाली आणि या भोंदू बाबाच्या संपर्कात आली. त्यावेळी पीडितेला या भोंदूने माझ्याकडे दिव्य शक्ती आहे. माझ्याकडे तंत्र मंत्र याची संपूर्ण माहिती आहे. या तंत्र-मंत्र जोरावर मी तुझा संपूर्ण कौटुंबिक कलह दूर करेन, अशी बतावणी करून आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तो त्या पीडितेला अंगारे-धुपारे देऊ लागला. ती महिलाही या भोंदूच्या बोलण्यात फसून रोज त्याच्याकडे येऊ लागली. या भोंदू बाबांना आपल्या बोलण्यात या महिलेला गुंतवले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली.
पीडित महिलेला या भोंदूच्या जाळ्यात अडकून काहीतरी विपरीत घडते आहे,हे लक्षात येऊ लागले. त्यानंतर या महिलेने थेट कांदिवली पोलीस स्टेशन गाठले आणि तिची फसवणूक झाली असून तो भोंदू इतरांचीही फसवणूक करत असल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या. पोलिसांंकडून मिळालेल्या माहितीनुसार हा भोंदू बाबा कांदिवली बोरिवली परिसरातल्या हायप्रोफाईल भागात आपले ऑफिस बनवायचा आणि तिथून येणाऱ्या भक्तांना गंडा घालायचा. दरम्यान, भोंदूगिरीच्या आहारी जाऊन आपले सर्वस्व गमावू नये, असे आवाहन पोलिसांनी सर्वासामान्य नागरिकांना केले आहे.