ETV Bharat / city

'ज्योत नसलेली भीमज्योत ही आंबेडकरी जनतेची फसवणूक' - indu mill

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीत मागील आठवड्यात चैत्यभूमीसमोरील अशोक स्तंभाजवळ अखंड भीमज्योत उभारण्यात आली. ही भीमज्योत उभारून आठवडा उलटला तरी अद्यापही ही ज्योत पेटलीच नसल्याने आंबेडकरी जनतेची घोर फसवणूक झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भीमज्योत , दादर चैत्यभूमी
author img

By

Published : Sep 15, 2019, 9:17 PM IST

मुंबई - दादर येथील चैत्यभूमी येथे मोठा गाजावाजा करत अखंड भीमज्योत उभारण्यात आली. मात्र ही भीमज्योत उभारून आठवडा उलटला तरी अद्यापही ही ज्योत पेटलीच नसल्याने आंबेडकरी जनतेची घोर फसवणूक झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते दिपक गायकवाड यांची प्रतिक्रिया

भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी हे स्मारक आहे. या स्मरकाशेजारी असलेली इंदू मिलची जागा सरकारने ताब्यात घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाईल, असे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी आधी सांगितले होते. मात्र गेल्या पाच वर्षात सरकारला स्मारक उभारता आलेले नाही.

हेही वाचा - चैत्यभूमीसमोर भीमज्योत उभारणे हा सरकारचा राजकीय डाव - आनंदराज आंबेडकर

डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारता आले नसताना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीत मागील आठवड्यात चैत्यभूमीसमोरील अशोक स्तंभाजवळ अखंड भीमज्योत उभारण्यात आली. आमदार कालिदास कोळंबकर यांच्या प्रयत्नाने भीमज्योत उभारण्यात आली. या भीमज्योतीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

हेही वाचा - चैत्यभूमीतील 'अखंड भीमज्योती' चे रामदास आठवलेंच्या उपस्थितीत लोकार्पण

दरम्यान चैत्यभूमीला दररोज हजारो आंबेडकरी अनुयायी भेट देतात. हे अनुयायी भीमज्योत मोठ्या कुतूहलाने बघत असतात. मात्र या भीमज्योतीमध्ये अद्याप ज्योत पेटली नसल्याने आंबेडकरी जनतेचा भ्रमनिरास होत आहे. एकीकडे बाबासाहेबांचे इंदू मिलमधील स्मारक उभारले नसताना भीमज्योत अर्धवट असताना त्याचे उद्घाटन केल्याने आंबेडकरी जनतेत संतापाची लाट पसरली आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी जनता सरकारला माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते दिपक गायकवाड यांनी दिली.

Intro:मुंबई - दादर चैत्यभूमी येथे मोठा गाजावाजा करत अखंड भीमज्योत उभारण्यात आली. मात्र ही भीमज्योत उभारून आठवडा उलटला तरी अद्यापही ही ज्योत पेटलीच नसल्याने आंबेडकरी जनतेची घोर फसवणूक झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.Body:भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर चैत्यभूमी हे स्मारक आहे. या स्मरकाशेजारी असलेली इंदू मिलची जागा सरकारने ताब्यात घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाईल असे सरकारकडून मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी आधी सांगण्यात आले.
मात्र गेल्या पाच वर्षात सरकारला असे स्मारक उभारता आलेले नाही.

डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारता आले नसताना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीत मागील आठवड्यात चैत्यभूमीसमोरील अशोक स्तंभाजवळ अखंड भीमज्योत उभारण्यात आली. आमदार कालिदास कोळंबकर यांच्या प्रयत्नाने भीमज्योत उभारण्यात आली असून या भीमज्योतीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

दरम्यान चैत्यभूमीला दररोज हजारो आंबेडकरी अनुयायी भेट देतात. हे अनुयायी भीमज्योत मोठ्या कुतूहलाने बघत असतात. मात्र या भीमज्योतीमध्ये अद्याप ज्योत पेटली नसल्याने आंबेडकरी जनतेचा भ्रमनिरास होत आहे. एकीकडे बाबासाहेबांचे इंदू मिलमधील स्मारक उभारले नसताना भीमज्योत अर्धवट असताना त्याचे उदघाटन केल्याने आंबेडकरी जनतेत संतापाची लाट पसरली आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी जनता सरकारला माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते दिपक गायकवाड यांनी दिली आहे.

सोबत
बातमीसाठी vis आणि बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.