मुंबई : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदे प्रकरण (Bhima Koregaon and Elgar Parishad) आरोपी ज्योती जगताप (Jyoti Jagatap Bail Refused) यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका देत उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला (Jyoti Jagtap denied bail by Mumbai High Court). जामीन अर्जाला उच्च न्यायालयात एनआयएने् विरोध केला होता. तसेच एनआयएने (NIA on Jyoti Jagtap bail) म्हटले होते की, माओवादी चळवळीत (Maoist Movement) आरोपी जगताप यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच त्यांनी शस्त्र आणि स्फोटक बनवणे आणि उपयोग करण्याचे प्रशिक्षण देखील घेतले होते. यापूर्वी ज्योती जगताप यांचा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने जामीन फेटाळला होता. (Latest News from Mumbai)
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील कबीर कला मंचाचे सदस्य आरोपी ज्योती जगताप यांच्या जामीन मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने फेटाळल्यानंतर त्या निर्णयाला उच्च न्यायालयात अहवाल देण्यात आले होते मात्र उच्च न्यायालयाने देखील जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आज सोमवार रोजी न्या. अजय गडकरी यांच्या एक सदस्य खंडपीठाने निर्णय दिला आहे. आरोपी ज्योती जगताप यांच्या अर्जाला राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने विरोध केला आहे. एनआयएने असे म्हटले आहे की माओवादी चळवळीत आरोपी जगताप यांचा सक्रिय सहभाग होता तसेच त्यांनी शस्त्र आणि स्फोटक बनवणे आणि उपयोग करण्याचे प्रशिक्षण देखील घेतले होता असे तपास यंत्रणे कडून युक्तिवाद करण्यात आला होता.
माओवादी चळवळीचा प्रसार करत असल्याचा आरोप आरोपी ज्योती जगताप यांनी न्यायालयात असे म्हटले आहे की तपास यंत्रणेने केलेले आरोप खोटे असल्याचा दावा करीत जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु एनआयएने तिच्या याचिकेला विरोध केला. ज्योती प्रतिबंधित सीपीआयची माओवादी सदस्य असून शहरी भागात माओवादी चळवळीचा प्रसार करीत होती. यासाठी तिने शस्त्रे आणि स्फोटके वापरण्याचे प्रशिक्षण घेतले होते असे एनआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
काय म्हटले एनआयएने? या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांच्या सूचनेनुसार 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या उपस्थितांना भडकवल्याचा आरोप जगताप यांच्यासह कबीर कला मंचच्या अन्य दोन सदस्यांवरही चुकीचा असल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले. गायिका व कलावंत ज्योतीने आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता आणि आपल्याविरुद्ध कोणतेही प्रथमदर्शनी पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणा अयशस्वी ठरल्याचे म्हटले आहे. जगतापने 31 डिसेंबर रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत सरकारचा निषेध करण्यासाठी आणि सरकारविरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी दलित समाजाला एकत्रित करण्यासाठी प्रयत्न केले होते, असे एनआयने शपथपत्राद्वारे न्यायालयाला सांगितले. 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचाराला चालना देणार्या परिषदेत चिथावणीखोर भाषणे करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी परिषदेला माओवाद्यांचे समर्थन असल्याचे म्हटले होते, असेही एनआयएने म्हटले आहे.
प्रशिक्षण घेतल्याचा आरोपह- गायक आणि कलाकार जगताप यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. एनआयए त्याच्या विरोधात कोणतेही प्रथमदर्शनी पुरावे प्रदान करण्यात अपयशी ठरले होते. त्याचवेळी 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या परिषदेत जगताप यांनी दलितांना सरकारचा निषेध करण्यासाठी आणि सरकारविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी भडकवले होते असे तपास यंत्रणेने म्हटले आहे. जगताप यांनी 2011 मध्ये शस्त्रे आणि स्फोटके वापरण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा आरोपही एनआयएने केला आहे. जगताप यांनी आपल्या याचिकेत हा दावा फेटाळून लावला आहे. एनआयएने सांगितले की एल्गार परिषदेच्या संघटनेच्या निधीचा हिशेब ठेवण्याची जबाबदारीही जगताप यांच्यावर होती.
आरोपीत यांचा समावेश- भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कार्यकर्ते रोना विल्सन, नागपूरस्थित वकील सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापक शोमा सेन, महेश राऊत, रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे, वकील कार्यकर्ते सुधा भारद्वाज, तेलुगू कवी पी वरवरा राव, कार्यकर्ते अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस आहेत. मृत स्टेन स्वामी, गौतम नवलखा, प्राध्यापक हनी बाबू, सागर गोरखा, रमेश गायचोर, ज्योती जगताप व फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश आहे.
काय आहे भीमा कोरेगाव प्रकरण? पेशव्यांचं मराठा सैन्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केलं होतं. या युद्धात पेशव्यांविरोधात ईस्ट इंडिया कंपनीबरोबर महार रेजिमेंट लढली होती आणि यात बहुतांश दलित सैनिक होते.
पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. या हिंसाचाराला एक दिवस अगोदर म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदे तील वक्तव्यं कारणीभूत होती अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. या एल्गार परिषदे मागे माओवादी संघटनांचा हात होता असं म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली.