ETV Bharat / city

Bhim Army Demand On BJP Office : मंत्रालयाजवळील भाजपाचे अनधिकृत कार्यालय तोडा, भीम आर्मीची पालिकेकडे मागणी

मंत्रालयाजवळ भाजपा पक्ष ( Mumbai Bjp Office ) कार्यालय आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यालय म्हणून त्याला ओळख आहे. मात्र, हे कार्यालय अनधिकृत असल्याने त्यावर मुंबई महापालिकेने ( Bhim Army Demand To Break Mumbai BJP Office ) कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे.

Bhim Army Demand On BJP Office
Bhim Army Demand On BJP Office
author img

By

Published : Feb 11, 2022, 5:18 AM IST

मुंबई - मंत्रालयाजवळ भाजपा पक्ष ( Mumbai Bjp Office ) कार्यालय आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यालय म्हणून त्याला ओळख आहे. मात्र, हे कार्यालय अनधिकृत असल्याने त्यावर मुंबई महापालिकेने ( Bhim Army Demand To Break Mumbai BJP Office ) कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे. भाजपा कार्यालयावर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास पालिका मुख्यलयात घुसून आंदोलन करू, असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया

भाजपा कार्यलयावर कारवाई करा -

मंत्रालयाजवळ भारतीय जनता पक्षाचे कार्यालय आहे. हे कार्यालय बेकायदेशीर पणे उभारले असल्याने अनधिकृत आहे. त्यामुळे त्या कार्यालयावर कारवाई करून ते हटवावे, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. मुंबईत अनेक झोपड्यांवर कारवाई केली जाते. मग भाजपाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई का केली जात नाही, भाजपाच्या अनधिकृत बांधकामाला पालिकेने संरक्षण दिले आहे का, असा प्रश्नही कांबळे यांनी उपस्थित केला आहे.

कारवाईसाठी पत्र -

मंत्रालयाजवळ असलेले भाजपाचे कार्यालय बेकायदेशीर रित्या बांधण्यात आले आहे. यामुळे त्यावर कारवाई करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव तसेच पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र दिले आहे. पालिकेने हे बेकायदेशीर बांधकाम त्वरित तोडावे, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती कांबळे यांनी दिली.

हेही वाचा - Hijab Ban : 'पुढील निकाल येईपर्यंत हिजाबाचा आग्रह नको', सोमवारी होणार सुनावणी, न्यायालयाचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.