ETV Bharat / city

MPSC Recruitment : एमपीएससीच्या माध्यमातून राज्यात पंधरा हजार रिक्त पदांची भरती- राज्यमंत्री भरणे - उपमुख्यमंत्री अजित पवार घोषणा

सदस्य अ गट ३२२६, ब गट २८४४ गट १८९१ आज आपल्याकडे ८००० पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झालेले आहे. मागणी झालेल्या पदांपैकी गट अ साठी २३०७. गट ब साठी १३८३, आणि क गटासाठी १५८३ एकूण ५२७३ पदाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

एमपीएससी
एमपीएससी
author img

By

Published : Feb 16, 2022, 7:09 PM IST

मुंबई - कोरोना काळामुळे रखडलेल्या नोकर भरतीला आता हिरवा कंदिल मिळाला असून राज्यात एमपीएससीच्या माध्यमातून पंधरा हजार रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यापैकी साडेपाच हजार पदांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

आपला मुलगा, भाऊ कुठेतरी नोकरीत लागेल, अधिकारी होईल, एखाद्या मोठ्या हुद्द्यावर जाईल या अपेक्षेने गेली ४ ते ५ वर्ष हे शहरांमध्ये कुटुंबियांनी मुलांना अभ्यासासाठी पाठवलं होतं. तसेच सगळ्या विद्यार्थ्यांची तयारी पण झाली होती. परंतु, कोरोनामुळे आपल्याला परीक्षा घेता आल्या नाहीत आणि विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला. या मुलांना न्याय दिला पाहिजे. या परीक्षा पूर्ववत सुरू झाल्या पाहिजे. त्यासाठी निर्णय घेऊन या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यांमध्ये एमपीएससीच्या माध्यमातून १५हजार ५११ रिक्त पदेही भरली जातील, याप्रमाणे काम सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी दिली.

८००० पदांचे मागणीपत्र लोकसेवा आयोगास प्राप्त
सदस्य अ गट ३२२६, ब गट २८४४ गट १८९१ आज आपल्याकडे ८००० पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झालेले आहे. मागणी झालेल्या पदांपैकी गट अ साठी २३०७. गट ब साठी १३८३, आणि क गटासाठी १५८३ एकूण ५२७३ पदाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे पुढील कारवाई सुरू झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती राज्य सेवेचा निकाल लागूनही आरक्षणाच्या कारणामुळे कोर्टात काही विद्यार्थी गेल्यामुळे भरती करता येत नव्हती. त्याबाबत निर्णय झाल्यानंतर राज्यसेवेच्या ४१६ जागांसाठी आपण नेमणूक पत्रे दिली आहेत. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या तरी माहिती घेत असून आता भरती प्रक्रिया वेगाने राबवली जाते आहे. त्यामुळे कुणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही भरणे यांनी केले आहे.

हेही वाचा - Solapur Farmer Protest : सोलापुरात शेतकऱ्याने रचली स्वतःची चिता.. चितेवरच पेटवून घेण्याचा दिला इशारा, कारण..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.