ETV Bharat / city

भांडुप आग : दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत - मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

भांडुप येथील ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाच्या आगीची घटना दुर्दैवी असून यासंदर्भात हलगर्जीपणा करणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित प्रशासनाला दिले. आगीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.

bhandup fire cm uddhav thackeray
bhandup fire cm uddhav thackeray
author img

By

Published : Mar 26, 2021, 3:22 PM IST

मुंबई - भांडुप येथील ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाच्या आगीची घटना दुर्दैवी असून यासंदर्भात हलगर्जीपणा करणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित प्रशासनाला दिले. आगीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत जाहीर -

दरम्यान, मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केल्याची घोषणा केली. तसेच राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरु आहेत. त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

वाढत्या कोविड संसर्गामुळे विविध इमारती किंवा वास्तूंमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अशा प्रकारच्या फिल्ड रुग्णालयांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. आजच्या आगग्रस्त रुग्णालयास देखील तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीच मी भंडारा येथे जिल्हा रुग्णालय आगीनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेची तपासणी करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे कोविड उपचारासाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील सर्व फिल्ड रुग्णालये व इमारतींमधील रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेची खातरजमा करून घेण्यात यावी असे निर्देश दिले आहेत.

रुग्णांना इतरत्र हलवा -
आगीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यानी पालिका आयुक्त व महापौर यांच्याशी चर्चा केली. यावेळी जखमी तसेच इतर कोविड रुग्णांना इतरत्र हलवून त्यांना व्यवस्थित उपचार मिळतील, अशी व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.