ETV Bharat / city

बेस्टच्या ताफ्यात डिसेंबर 2022पर्यंत येणार दोन हजार इलेक्ट्रिक बसेस!

डिसेंबर २०२२मध्ये बेस्टच्या ताफ्यात दोन हजार इलेक्ट्रिक बसेसची भर पडणार आहे. केंद्र सरकारच्या फेम २ योजनेअंतर्गत या बसेस बेस्ट भाडेतत्वावर घेणार आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

author img

By

Published : Aug 26, 2021, 4:36 PM IST

मुंबई - मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास प्रदूषण विरहित करण्यासाठी डिसेंबर २०२२मध्ये बेस्टच्या ताफ्यात दोन हजार इलेक्ट्रिक बसेसची भर पडणार आहे. केंद्र सरकारच्या फेम २ योजनेअंतर्गत या बसेस बेस्ट भाडेतत्वावर घेणार आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

इलेक्ट्रिक बसेसवर खर्च कमी

दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत आहे. तसेच इंधनाच्या धुरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्वच राज्यांना इलेक्ट्रिक बसेस चालविण्याकरिता प्राधान्य देण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयातंर्गत 'फेम' (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स) योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत राज्यांना इलेक्ट्रिक बससाठी सबसिडी देण्यात येते. सार्वजनिक वाहतुकीला बळकटी देण्याकरिता आणि रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बसला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार बेस्ट उपक्रमात २८८ विजेवरील बसेस बेस्टच्या ताफ्यात आहेत. विशेष म्हणजे सीएनजी बसमागे प्रतिलिटर सरासरी १८ ते १९ रुपये, डिझेल बसमागे ३८ ते ३९ रुपये खर्च येतो. मात्र विद्युत बसमागे हाच खर्च नऊ रुपये येतो. त्यामुळे इलेक्ट्रिक बसेस बेस्टचा ताफ्यात समाविष्ट करण्यावर बेस्टकडून प्रयत्न केले जात आहे. या बातमीला बेस्ट उपक्रमांचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दुजोरा दिला आहे.

बेस्टच्या ताफ्यात ३ हजार ३२८ बसेस

बेस्टच्या ताफ्यात सध्या तीन हजार ३२८ बस असून यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचा समावेश आहे. बेस्ट उपक्रमात स्वमालकीच्या सीएनजीवरील १ हजार ६९०, डिझेलवरील २९५ आणि इलेक्ट्रिकवरील ६ अशा एकूण १ हजार ९९१ बेस्ट बसेसचा ताफा आहे. तर भाडेतत्त्वावरील, सीएनजीवरील ५००, इलेक्ट्रिकवरील २८२ आणि डिझेलवरील ५५५ अशा एकूण १ हजार ३०५ बसेसचा ताफा आहे. डिझेलच्या वाढत जाणाऱ्या किमतींमुळे खर्च कमी करण्यासाठी डिझेलवरील स्वमालकीच्या बसही सीएनजीमध्ये रूपांतरित करण्यात येत आहे. त्याचबरोबर डिसेंबर २०२२मध्ये बेस्टच्या ताफ्यात दोन हजार इलेक्ट्रिक बसेसची भर पडणार आहे.

स्वमालकीच्या बसेस

  • सीएनजी - १ हजार ६९०
  • डिझेल - २९५
  • इलेक्ट्रिक - ०६

भाडेतत्त्वावरील बसेस

  • सीएनजी - ५००
  • डिझेल - ५५५
  • इलेक्ट्रिक - २८२

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.