ETV Bharat / city

बेस्टच्या पहिल्या एसी डबल डेकर बसचे दोन वेळा होणार लोकार्पण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बेस्टच्या ताफ्यात पहिली इलेकट्रीक एसी बस आज दाखल होत आहे. यासाठी सकाळी १० वाजता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण केंद्रात कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला हिंदुजा ग्रुप ऑफ कंपनीजचे अशोक हिंदुजा, अशोक लेलँडचे शोम हिंदुजा, स्विच मोबिलिटीचे सीईओ महेश बाबू हे उपस्थित राहणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टाटा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉईंट, मुंबई येथे सायंकाळी ६.३० वाजता बेस्टकडून लोकार्पणाचे आयोजन करण्यात आले आहे.

bests first ac double decker bus will be launched twice in mumbai
बेस्टच्या पहिल्या एसी डबल डेकर बसचे दोन वेळा होणार लोकार्पण
author img

By

Published : Aug 18, 2022, 7:09 AM IST

Updated : Aug 18, 2022, 10:04 AM IST

मुंबई बेस्ट उपक्रमाकडून चांगल्या व वातानुकिलत बसेस चालवल्या जात आहेत. तसेच भाडेही कमी असल्याने प्रवाशांकडून बेस्टला प्राधान्य दिले जात आहे. प्रवाशांना आणखी चांगली सुविधा देण्यासाठी इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण केंद्रात आज (१८ ऑगस्ट) सकाळी ही बस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सुपूर्द केली जाणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सायंकाळी बेस्टकडून लोकार्पणाचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच बसचे दोन वेळा लोकार्पण केले जाणार असल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

बेस्टच्या पहिल्या एसी डबल डेकर बसचे दोन वेळा होणार लोकार्पण

लंडनच्या धर्तीवर बस बेस्टला मुंबईकरांची लाईफलाईन बोलली जाते. ३० लाख प्रवाशी बेस्टने रोज प्रवास करतात. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी भाडेतत्वावर एसी बसेस घेण्यात आल्या आहेत. डबल डेकर बस बेस्टची शान आहे. या बसेसचे आयुर्मान संपल्याने त्या भंगारात काढल्या जाणार आहेत. बेस्टकडून पर्यावरणाच्यादृष्टीने इलेक्ट्रिक बसेस खरेदीवर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून नव्याने एसी इलेकट्रीक डबल डेकर बसेस घेण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. लंडनच्या धर्तीवर बसेस मुंबईमध्ये सुरु केल्या जाणार आहेत.

बस मुंबईत दाखल इलेक्ट्रिक बस या पर्यावरणपूरक असल्याच्या दावा केला जातो. त्या धाटणीत तयार केलेली पहिलीवहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस बेस्टच्या ताफ्यात सामील होणार आहे. डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बसमध्ये दोन्ही बाजूने प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा मिळणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्हीची सुविधा देण्यात आली आहे. आकर्षक असलेली ही बस मुंबईत दाखल झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बेस्टच्या ताफ्यात डिसेंबर अखेरीपर्यंत २२५, मार्च २०२३ पर्यंत २२५ आणि जून २०२३ पर्यंत उर्वरित ४५० बस येतील असे सांगण्यात आले आहे.

बस लोकार्पणाचे दोन कार्यक्रम बेस्टच्या ताफ्यात पहिली इलेकट्रीक एसी बस आज दाखल होत आहे. यासाठी सकाळी १० वाजता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण केंद्रात कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला हिंदुजा ग्रुप ऑफ कंपनीजचे अशोक हिंदुजा, अशोक लेलँडचे शोम हिंदुजा, स्विच मोबिलिटीचे सीईओ महेश बाबू हे उपस्थित राहणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टाटा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉईंट, मुंबई येथे सायंकाळी ६.३० वाजता बेस्टकडून लोकार्पणाचे आयोजन करण्यात आले आहे.

बेस्टच्या ताफ्यातील बसेस
बेस्टच्या मालकीच्या बसेस १८५४
भाडेतत्वावरील बसेस १७९३
एकूण बसेस ३६२७

Last Updated : Aug 18, 2022, 10:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.