ETV Bharat / city

बेस्ट कामगारांचा वेतनकरार राजकारण करण्यासाठीच - विरोधी पक्षनेत्यांचा आरोप

बेस्ट कर्मचाऱ्यांचा वेतन करार व सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे इतर युनियनच्या सदस्यांना नव्या वेतन कराराचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे हा सामंजस्य करार फक्त राजकारण करण्यासाठीच करण्यात आला असल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते रवी राजा
author img

By

Published : Sep 14, 2019, 8:04 AM IST

मुंबई - शिवसेना समर्थित बेस्ट कामगार सेना आणि भाजपच्या बेस्ट कामगार संघ या युनियनसोबत बेस्ट कर्मचाऱ्यांचा वेतन करार आणि सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा सामंजस्य करार झाला आहे. हा करार करून इतर युनियनवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या करारामुळे इतर युनियनच्या सदस्यांना नव्या वेतन कराराचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे हा सामंजस्य करार फक्त राजकारण करण्यासाठीच करण्यात आला असल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

बेस्ट कामगारांचा वेतनकरार राजकारण करण्यासाठीच

बेस्ट कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करार लागू करावा, वेतन करार करावा, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण करावा यांसह आदी मागण्या बेस्ट कामगारांच्या आहेत. त्यासाठी कृती समितीने आंदोलन आणि उपोषण केले. याच दरम्यान मुंबई महापालिका आणि बेस्टमध्ये सत्ताधारी असलेल्या बेस्ट कामगार सेना व भाजपच्या बेस्ट कामगार संघ यांच्याशी बेस्ट प्रशासनाने वेतन करार करून सातवा वेतन तत्त्वता लागू करण्याचा करार करण्यात आला.

याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे म्हणाले की, ज्या युनियन बरोबर करार झाला आहेत, त्यांच्या सदस्यांनाच याचा लाभ मिळेल. आम्ही कर्मचाऱ्यांना करार काय केला जाणार आहे त्याची माहिती ५ सप्टेंबरला दिली आहे. त्यांना हा करार मान्य असेल तर त्यांना दिलेले फॉर्म २५ सप्टेंबरपर्यंत भरून द्यावेत, असे आवाहन केले. सामंजस्य करार मान्य आहे काय हे कर्मचाऱ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत कळवायचे आहे. कर्मचाऱ्यांना वेळ दिली असताना इतक्या घाईने सत्ताधारी पक्षाच्या युनियन बरोबर करार करण्याची गरज काय होती, असा प्रश्न विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला. सर्व कामगार युनियनला सोबत घेऊन हा करार करायला हवा होता. मात्र ज्यांच्याकडे कमी सभासद आहेत अशा युनियनबरोबर करार करून इतर युनियनवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्यासारखा असल्याचेही रवी राजा यांनी म्हटले आहे.

या कराराविरोधात युनियन न्यायालयात गेल्या आहेत. न्यायालयाने काराराविरोधात निर्णय दिल्यास किंवा करारात बदल करण्यास सांगितल्यास तसे बदल करण्याचे संकेत बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. करारात नंतर बदल केले जाणार असतील तर मग २५ सप्टेंबरपर्यंत कामगारांकडून सूचना येईपर्यंत वाट का बघितली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. हे सर्व राजकारण करण्यासाठी केले जात असल्याचा आरोपही रवी राजा यांनी केला आहे.

Intro:मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांचा वेतन करार व सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा सामंजस्य करार हा सत्ताधारी शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेना व भाजपच्या बेस्ट कामगार संघ या युनियनसोबत झाला आहे. असा करार करून इतर युनियनवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या करारामुळे इतर युनियनच्या सदस्यांना नव्या वेतन कराराचा लाभ मिळणार नाही. याकारणाने हा सामंजस्य करार फक्त राजकारण करण्यासाठीच करण्यात आला आहे असा आरोप पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. Body:बेस्ट कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करार, वेतन करार करावा, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण करावा आदी मागण्या बेस्ट कामगारांच्या आहेत. त्यासाठी कृती समितीने आंदोलन आणि उपोषण केले. याच दरम्यान मुंबई महापालिका आणि बेस्टमध्ये सत्ताधारी असलेल्या बेस्ट कामगार सेना व भाजपाच्या बेस्ट कामगार संघ यांच्याशी बेस्ट प्रशासनाने वेतन करार करून सातवा वेतन तत्त्वता लागू करण्याचा करार केला.

याबाबतचा प्रस्ताव आज बेस्ट समितीमध्ये सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी ज्या युनियन बरोबर करार झाला आहे त्यांच्या सदस्यांनाच याचा लाभ मिळेल. आम्ही कर्मचाऱ्यांना करार काय केला जाणार आहे त्याची माहिती ५ सप्टेंबरला दिली आहे. त्यांना हा करार मान्य असेल तर त्यांना दिलेले फॉर्म त्यांनी २५ सप्टेंबरपर्यंत भरून द्यावेत असे आवाहन केले.

यावेळी बोलताना सामंजस्य करार मान्य आहे का हे कर्मचाऱ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत कळवायचे आहे. कर्मचाऱ्यांना वेळ दिली असताना इतक्या घाईने सत्ताधारी पक्षाच्या युनियन बरोबर करार करण्याची गरज काय होती असा प्रश्न विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला. सर्व कामगार युनियनला सोबत घेऊन हा करार करायला हवा होता. मात्र ज्यांच्याकडे कमी सभासद आहेत अशा युनियनबरोबर करार करून इतर युनियनवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्यासारखा असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे.

या कराराविरोधात युनियन कोर्टात गेल्या आहेत. कोर्टाने काराराविरोधात निर्णय दिल्यास किंवा करारात बदल करण्यास सांगितल्यास तसे बदल करण्याचे संकेत बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. करारात नंतर बदल केले जाणार असतील तर मग २५ सप्टेंबरपर्यंत कामगारांकडून सूचना येईपर्यंत वाट का बघितली नाही असा प्रश्न उपस्थित करत हे सर्व राजकारण करण्यासाठी केले जात असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचा बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.