ETV Bharat / city

बेस्ट कर्मचाऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये - सुहास सामंत - बेस्ट प्रशासन

कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना आपण जर सेवा पुरविली नाही, तर काय होईल, या रुग्णांचे असा प्रश्न सुहास सामंत यांनी उपस्थित केला आहे. या कठीण प्रसंगी राजकारण करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, बेस्ट कामगार सेना कामगारांच्या पाठीशी आहे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

Best
बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत
author img

By

Published : May 15, 2020, 3:52 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी बेस्ट बस आपली सेवा बजावत आहे. अशा या कठीण प्रसंगी बेस्ट कर्मचाऱ्यांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केले आहे.

बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत

बेस्ट सेवा सुरू झाल्यावर बेस्ट प्रशासनाने सर्वांचे पगार व प्रोत्साहन भत्ता दिला आहे. बेस्ट प्रशासनाकडून अत्यावश्यक दक्षता सामुग्री दिली जात आहे. मात्र ती अपुरी पडत असल्यास त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून उपलब्ध करून दिली जाईल, असेही सामंत यांनी म्हटले आहे. बेस्ट कृती समितीने सोमवारी काम न करता लॉकडाऊन पाळण्याचे जाहीर केले, त्यावर सुहास सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आज साधारण एकूण बस प्रवर्तनाच्या ३० टक्के प्रवर्तन सुरू आहे. आज कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना आपण जर सेवा पुरविली नाही, तर काय होईल, या रुग्णांचे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनामुळे मृत झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वारसाला तात्काळ नोकरी देण्याचा कायदा मंजूर झाला. दररोज काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड विशेष रजा मंजूर होण्यास सुरुवात झाली. अपंग, आजारी कर्मचाऱ्यांना विश्रांती देण्याचे आदेश निघाले, ५५ वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांनाही कोरोना संसर्ग होऊ नये, म्हणून घरी राहण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे या कठीण प्रसंगी राजकारण करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, बेस्ट कामगार सेना कामगारांच्या पाठीशी आहे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.