ETV Bharat / city

BEST Issued Notice : 'या' कारणामुळे मिनी बसचे कंत्राट रद्द करण्याची बेस्टने दिली नोटीस... - BEST issued notice to cancel contract

मुंबईची लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी खाजगी कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या एसी बसेस चालवल्या जात (BEST cancel contract of mini buses) आहेत. एमपी ग्रुपला दिलेले कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावली असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून 'ईटिव्ही भारत'ला देण्यात आली (BEST issued notice) आहे.

Mini bus
मिनी बस
author img

By

Published : Sep 20, 2022, 1:01 PM IST

मुंबई - मुंबईची लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी खाजगी कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या एसी बसेस चालवल्या जात (BEST cancel contract of mini buses) आहेत. यामधील २८० मिनी बस एमपी ग्रुपकडून चालवल्या जात (BEST contract with MP group) आहेत. या कंपनीकडून ड्रायव्हरला वेळेवर पगार दिला जात नाही, यामुळे सातत्याने संप केला जात आहे. तसेच या बसेसचे मेंटेनन्स ठेवले जात नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे एमपी ग्रुपला दिलेले कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावली असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून 'ईटिव्ही भारत'ला देण्यात आली (BEST issued notice) आहे.

प्रवासी, खासगी कर्मचारी त्रस्त - मुंबईमध्ये रेल्वे आणि बेस्टकडून परिवहन सेवा दिली जाते. रेल्वेमधून 75 लाख तर बेस्टमधून ३० लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी बेस्टकडून खाजगी भाडेतत्त्वावर एसी बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखद झाला आहे. बेस्टने छोट्या रस्त्यासाठी एमपी ग्रुपकडून २८० मिनी एसी बसेस भाडे तत्वावर घेतल्या आहेत. बेस्टच्या ४० मार्गावर या बस चालवल्या जात होत्या. या बसमध्ये एसी चालत नाहीत, त्यांचे मेन्टेनन्स योग्य प्रकारे ठेवले जात नाही, यामुळे प्रवाशांना त्रास होतो. तसेच बेस्टकडून या कंत्राटदाराला वेळोवेळी पैसे दिले जात असले तरी ड्रायव्हरला मात्र पगार वेळेवर दिला जात नाही. यामुळे सातत्याने संप केला जात होता, याचा परिणाम बेस्टच्या सेवेवर होत (mini buses causing exhaustion salary of drivers) होता.

कंत्राटदाराची बेफिकिरी - बेस्ट उपक्रमांकडून एमपी ग्रुपबरोबर केलेल्या कंत्राटानुसार बस सेवा वेळेवर न चालवल्यास कंत्राटदाराकडून दर दिवसाला पाच हजार रुपये याप्रमाणे साडे तीन कोटी रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. त्यानंतरही कंत्राटदाराकडून ड्रायव्हरना वेळेवर पगार दिला जात नसल्याने कंपनी विरोधामध्ये ड्रायव्हरनी न्यायालयात दाद मागितली आहे. यामुळे बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. २८० पैकी २६६ बसेस बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे बेस्ट प्रशासनाने कंत्राटदाराला त्याचे कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावली, असल्याची माहिती बेस्टच्या जनसंपर्क अधिकारी मनोज वऱ्हाडे यांनी (mini buses causing inconvenience to passengers) दिली.

प्रवाशांसाठी बेस्टच्या बसेस - बेस्टने कंत्राटदारांकडून भाडेतत्वावर घेतलेल्या मिनी एसी बसेस ४० मार्गावर चालवल्या जात होत्या. कंत्राटदार कंपनी आणि त्यांचे ड्रायव्हर या वादामुळे या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. कंत्राटदाराच्या बसेस बंद झाल्या असल्या तरी त्या मार्गावरील प्रवाशांसाठी बेस्टकडून आपल्या स्वतःच्या बसेस चालवल्या जात आहेत. कंत्राटदारांमुळे प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी बेस्टकडून घेतली जात असल्याचे वऱ्हाडे यांनी (BEST issued notice to cancel contract) सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.