मुंबई - बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावर सेवा करणाऱ्या सुमारे 500 चालकांनी वेतन ( Best Drivers Strike ) मिळत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारपासून काम बंद आंदोलन पुकारले होते. हे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरू होते. या आंदोलनाच्या दणक्यानंतर अखेर कंत्राटदाराने रखडलेला पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला. त्यामुळे दुपारनंतर ही काम बंद आंदोलन मागे ( Best Strike Called Off ) घेण्यात आले. त्यामुळे बंद ठेवण्यात आलेली बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाला करून देण्यात आली आहे.
काम बंद आंदोलन - बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावर बस सेवेच्या धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार एमपी ग्रुप या कंत्राटदाराकडून बेस्टमधील कायमस्वरूपी बस सेवा सोडली, तर बससेवा खासगी पद्धतीने चालविल्या जात आहेत. सध्या बेस्टमध्ये भाडेतत्त्वावर अनेक मिनी, एसी बस चालविल्या जात आहेत. त्यासाठी बस सेवा चालविणाऱ्या कंत्राटदारांना प्रत्येक किलोमीटर मागे विशिष्ट रक्कम दिली जाते. यातून संबंधित कंत्राटदारांना चालकांचा पगार, इंधन देखभाल खर्च करावा लागतो. खासगी बससेवा चालवणाऱ्या एमपी ग्रुप या कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांचा पगार मागील पाच ते सात महिने दिला नसल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काल गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले. हे आंदोलन आज शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. त्यामुळे मुंबईतील वांद्रे, कुर्ला, कुलाबा, विक्रोळी आणि वडाळा या पाच आगारांमध्ये 275 बसेस आगारातून बाहेर काढण्यात आल्या नाहीत. सकाळच्या कामाला जाण्याच्या वेळी सेवा बंद राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले.
काम बंद आंदोलन मागे - एमपी ग्रुप कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या 175 बसगाड्या वेळापत्रकानुसार चालविणे आवश्यक होते. मात्र, कंत्राटदाराकडून याकडे दुर्लक्ष झाले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट उपक्रमाने इतर मार्ग तसेच इतर भागांमधून स्वतःच्या ८६ बस गाड्या चालवल्या. कंत्राटदाराकडून वेतन मिळेपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याची आक्रमक भूमिका घेतली. कर्मचाऱ्यांच्या आक्रमक आंदोलनाची दखल घेत अखेर कंत्राटदाराने रखडलेला पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला. त्यामुळे बस चालकांनी काम बंद आंदोलन मागे घेतले.
कंत्राटदारावर कारवाई - कंत्राटदारावर होणार कारवाई एमपी ग्रुप कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या बसगाड्या नियम व अटीनुसार चालविणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटदाराने कामगारांचे पाच ते सात महिन्यापासून वेतन दिले नाही. यासाठी कंत्राटदारावर कंत्राटामधील अटी व शर्थीनुसार दंड वसुली, कंत्राट रद्द करणे यापैकी जे कंत्राटामध्ये परिस्थिती अनुरूप कारवाई केली जाईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - Rana VS Shivsena : मातोश्रीवर उद्या 9 वाजता हनुमान चालीसाचे पठण करणारच; रवी राणांचा निर्धार