ETV Bharat / city

१ हजार ८८७ कोटी तुटीच्या अर्थसंकल्पाला बेस्ट समितीची मंजुरी - बेस्टच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

बेस्ट उपक्रमाने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान बेस्ट समिती सदस्यांनी तूट भरून काढण्याबाबत अनेक सूचना केल्या. चर्चेदरम्यान कोरोना काळातही कर्मचाऱ्यांना चार्जशीट देण्यात आल्याचा निषेध करत भाजपाने सभात्याग केला. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा बेस्ट समितीत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असून स्थायी समिती व सभागृहाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी दिली.

BEST
बेस्ट समिती
author img

By

Published : Nov 21, 2020, 9:30 AM IST

मुंबई - मुंबईकर प्रवाशांची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट उपक्रमाचा सन् २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा १,८८७.८३ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प दोन दिवसांच्या चर्चेनंतर बेस्ट समितीत मंजूर करण्यात आला. बेस्ट समितीत मंजूर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प स्थायी समिती व पालिका सभागृहात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

विद्युत विभागही तोट्यात -
बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांना सन् २०२१-२२ चा १,८८७.८३ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प १० ऑक्टोबरला सादर केला होता. या अर्थसंकल्पात विद्युत पुरवठा विभागाचे ३,५३२.३० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले असून खर्च ३,५९५.८९ कोटी रुपये अपेक्षित आहे. विद्युत विभागात २,६३.५९ कोटी रुपये तूट दर्शविण्यात आली आहे. अनेक वर्षात तोट्यात असलेल्या परिवहन विभागातही १,४०७ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आले आहे. तर ३०३१.२४ कोटी रुपये खर्चाचा आंदाज आहे. परिवहन विभागात १,६२४.२४ तूट दाखविण्यात आली आहे. विद्युत आणि परिवहन दोन्ही विभागांसाठी मिळून ४,९३९.३० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षिण्यात आले असून ६,८२७.१३ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला १,८८७.८३ कोटी रुपयांची तूट येणार आहे.

अर्थसंकल्पावर दोन दिवस चर्चा -
बेस्ट उपक्रमाने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान बेस्ट समिती सदस्यांनी तूट भरून काढण्याबाबत अनेक सूचना केल्या. चर्चेदरम्यान कोरोना काळातही कर्मचाऱ्यांना चार्जशीट देण्यात आल्याचा निषेध करत भाजपाने सभात्याग केला. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा बेस्ट समितीत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असून स्थायी समिती व सभागृहाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी दिली.

भाजपचा सभात्याग -
कोरोना संंकटसमयी आजही बेस्ट उपक्रमातील कर्मचारी लढा देत आहेत. या कालावधीत ज्या कर्मचाऱ्यांना चार्जशीट काढण्यात आली ती मागे घ्या, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य प्रकाश गंगाधर यांनी केली. अर्थसंकल्प मंजूर करण्यास भाजपचा पाठिंबा आहे. मात्र महाव्यवस्थापकांनी चार्जशीट मागे घेण्याबाबत काही उत्तर न दिल्याने भाजपने सभात्याग केल्याचे बेस्ट समिती सदस्य प्रकाश गंगाधरे यांनी सांगितले.

दोन वर्षात बेस्टने बसवले २ लाख इलेक्टॉनिक मीटर -

बेस्ट उपक्रमाने गेल्या २ वर्षात २ लाख इलेक्ट्रोनिक मीटर बसवले आहेत. येत्या वर्षात आणखी १ लाख इलेकट्रोनिक मीटर बसवले जाणार आहेत. २०२१ - २२ मध्ये स्वयंचलित वीजमापक पायाभूत प्रकल्प या अंतर्गत फॉल्ट पॅसेज इंडिकेटर यासह एकत्रित केलेली वीज मापन पद्धती आणि उच्च विद्युत ग्राहकांकरिता २० हजार स्मार्ट वीजमापकांची संच मांडणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये बेस्टकडे ३८७५ बसगाड्यांचा ताफा आहे. ज्यामध्ये १०९९ भाडेतत्वावरच्या बसगाड्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ३०० विद्यूत गाड्या खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ६०० एकमजली सीएनजी बसगाड्यांकरिता निविदा प्रक्रिया सुरू आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत बसचा ताफा ६३३७ इतका करण्याचे प्रस्तावित असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. बस स्थानके, बस चौक्या, बस स्टॉप अशा एकूण ८०० ठिकाणी प्रवासी माहिती प्रणाली कार्यरत केली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना बस किती वेळात बस स्टॉपवर येईल याची माहिती उपलब्ध होणार आहे.

'वन नेशन वन कार्ड'ची अंमलबजावणी -
भारत सरकारने देशातील सार्वजनिक वाहतुकीसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच 'एक देश एक कार्ड'च्या योजनेची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. त्यात रेल्वे, बस, मोनोरेल, मेट्रो याचा समावेश आहे. याची अंमलबजावणी बेस्टच्या कुलाबा आणि वडाळा स्थानकात ऑक्टोबर २०२० पासून केली जात असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे.

हेही वाचा -नागपूर महानगर पालिकेचा २ हजार ५०० कोटींचा अर्थसंकल्प सादर

हेही वाचा -'बेस्ट'चा १८८७.८३ कोटी तुटीचा अर्थसंकल्प, विद्युत विभागही तोट्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.