ETV Bharat / city

Beginning of Academic Year - आजपासून ऑनलाईन शिक्षण सुरू; कोरोनामुळे शाळा सुरू करणे शक्य नाही- वर्षा गायकवाड - आजपासून ऑनलाईन शिक्षण सुरू

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. ऑनलाईन माध्यमातून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

varsha gaikwad
वर्षा गायकवाड
author img

By

Published : Jun 15, 2021, 4:17 PM IST

मुंबई - राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. ऑनलाईन माध्यमातून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पहिली ते नववी शिक्षक ५० टक्के उपस्थिती, उर्वरित शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच दहावीच्या मूल्यमापनानंतर आता बारावी परीक्षांच्या मूल्यमापनाचे धोरण आम्ही लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही -

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शालेय जीवन खूप महत्वपूर्ण असते. याची जाणीव आम्हाला आहे. मात्र, राज्यात कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्यामुळे शाळा सुरू करता येणे शक्य नाही. या संकटकाळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देत, यंदा ऑनलाईन माध्यमातून पहिले ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची संपूर्ण काळजी शिक्षण विभागाने घेतली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तकं पीडीएफ स्वरुपात तयार करण्यात येत आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्षात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ‘ज्ञानगंगा’ या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

  • शाळा राहणार सुरू-

राज्यातील विदर्भ वगळता पहिले ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे २०२१-२२ शैक्षणिक वर्ष आजपासून सुरू करण्यात येत आहे. विदर्भातील शाळांचे शैक्षणिक वर्ष २८ जून २०२१ पासून सुरू करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते इयत्ता नऊ वी व इयत्ता अकरावीचे ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे १०० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. तसेच संपूर्ण शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या आराखडा तयार करण्यात आला आहे.

  • बारावीच्या मुल्यमापनाचे धोरण लवकरच -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्याचे राज्य मंडळाने ठरविले. त्याबाबतचे ११ जून २०२१ रोजी शासन निर्णय व शिक्षण मंडळाचे आदेश शाळांना प्राप्त झाले. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार दहावीचे मूल्यमापन कसे करावे याबाबत राज्यातील शिक्षकांना शिक्षण मंडळाने प्रशिक्षण दिले. त्यांचे निकाल तयार करण्याचे काम सुद्धा युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या बारावी परीक्षाही रद्द केली आहे. बारावी परीक्षांच्या मुल्यमापनाचे धोरण आम्ही लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

  • शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा -

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम करण्यासाठी शिक्षकांना शाळांमध्ये बोलवण्यात येत आहे. मात्र, मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा नसल्याने शिक्षकांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर शिक्षकांचे शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांशी या शिक्षकांना रेल्वे प्रवासाला परवानगी देण्याबाबत चर्चा केली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून या शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांना दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.