ETV Bharat / city

कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या, जयंत पाटील यांनी पंतप्रधानांना करून दिली आठवण - Karmveer baburao patil death anniversary

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तीन वर्षांपूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा आपल्या मागणीची आठवण करून दिली आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या

author img

By

Published : May 9, 2021, 1:52 PM IST

मुंबई- कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तीन वर्षांपूर्वी केली होती. आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा आपल्या मागणीची आठवण करून दिली आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजनांना शिक्षणाकडे वळवले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या शिक्षणासाठी समर्पित केले म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी तीन वर्षापूर्वी केली होती.

कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या
कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या

रयत शिक्षण संस्था नावाचा वटवृक्ष-

माझ्या दाढीत जितके केस आहेत तितके बहुजन शिक्षित करेन, असा संकल्पच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि अखंड ज्ञानदानाचा कार्यक्रम हाती घेतला. रयत शिक्षण संस्था नावाचा वटवृक्ष आजही तसाच उभा आहे आणि गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.