ETV Bharat / city

बार्ज पी-305 : नातेवाईकांच्या नाराजीनंतर ४४ मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण, २३ जणांची ओळख पटली - नौदलाकडून शोध

मुंबईत आलेल्या तौक्ते वादळादरम्यान ओएनजीसीच्या पी ३०५ या बार्जवर कर्मचारी अडकून पडले होते. त्यामधील सुमारे १८८ जणांची सुटका करण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

तौक्ते वादळ बार्ज दुर्घटना
तौक्ते वादळ बार्ज दुर्घटना
author img

By

Published : May 21, 2021, 6:04 PM IST

मुंबई - मुंबईत आलेल्या तौक्ते वादळादरम्यान ओएनजीसीच्या पी ३०५ या बार्जवर कर्मचारी अडकून पडले होते. त्यामधील सुमारे १८८ जणांची सुटका करण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही २६ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. नेव्हीचे शोधकार्य अद्यापही सुरू आहे. सध्या भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे रुग्णालयाच्या शवगृहात ५० मृतदेह ठेवण्यात आले आहेत. हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना तपास करणारे यलो गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी आले नसल्याने शवविच्छेदन झाले नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केल्यावर पोलीस अधिकारी उपस्थित झाल्यावर ४४ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. एकूण मृतांपैकी २३ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.

२३ जणांची ओळख पटवण्यात यश
मुंबईत सोमवारी १७ मे रोजी तौक्ते वादळ आले होते. या वादळादरम्यान समुद्रात ओएनजीसीसाठी काम करणारे २५० हून अधिक कर्मचारी पी ३०५ या बार्जवर काम करत होते. वादळ येणार असल्याने बार्ज किनाऱ्यावर नेण्याचे आदेश कॅप्टनला देण्यात आले होते. मात्र बार्ज किनाऱ्यावर न नेता त्याच ठिकाणी ठेवल्याने वादळात हे सर्व कर्मचारी अडकले. पाणी शिरल्याने बार्ज बुडू लागताच सर्वांनी समुद्राच्या पाण्यात उड्या मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. नेव्हीने यापैकी १८८ हून अधिक कर्मचाऱ्यांना वाचवले.

नातेवाईकांना राहावे लागले ताटकळत
बार्जवरील कर्मचाऱ्यांचे बचाव कार्य मंगळवारपासून सुरू आहे. जे मृतदेह मिळत आहेत ते जेजे रुग्णालयाच्या शवगृहात पाठवले जात आहेत. गेले दोन ते तीन दिवस मृतदेह शवगृहात आहेत. एकाच कर्मचाऱ्याचा मृतदेह गुरुवारी ताब्यात देण्यात आला आहे. इतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आज नातेवाईक रुग्णालयात आले होते. तेथे त्यांना तपास करणारे यलो गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी आले नसल्याचे समजले. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना त्या ताटकळत राहावे लागल्याने नातेवाईकांमध्ये पोलिसांविरोधात असंतोष निर्माण झाला होता. अधिकारी उपस्थित राहावे यासाठी यलो गेट पोलीस ठाण्यात शिष्टमंडळ घेऊन जाण्याचा निर्णयही नातेवाईकांनी घेतला होता.

नौदलाकडून शोध, बचावकार्य सुरूच
बार्ज पी-305 शोध आणि बचावकार्य सुरूच आहे. भारतीय नौदलाकडून बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांना वाचवले आहे, त्यांना मुंबईत परत आणले आहे. आयएनएस कोलकाता आणि कोचीच्या सहाय्याने हे कर्मचारी मुंबई बंदरात सुखरूप परतले. आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ५० जणांचे मृतदेह जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहेत. दरम्यान बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आयएनएस कोची पुन्हा एकदा शोध आणि बचाव कार्यासाठी रवाना झाले आहे.

'घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी'
हवामान विभागाने तौक्ते वादळाची पूर्वसूचना दिलेली असताना देखील या बार्जवरील कर्मचाऱ्यांना सुखरुपस्थळी का हलवण्यात आले नाही, याची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. तर एवढे मोठे वादळ येणार याची कल्पना दिली असताना हे सगळे घडले आहे. याला पूर्णपणे ओएनजीसी जबाबदार आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल, मग जेजे कंत्राटदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत. तसेच केंद्राने मृतांच्या नातेवाईकांना मदत केली पाहीजे, असे असे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

पी ३०५ बार्जवरील मृतांची नावे
१ सुमेश व्ही. एस.
२ ससिन इस्माईल
३ गोलख चंद्रा साहू
४ दिना सिंग
५ योगेश गोसावी
६ संदिपकुमार यादव
७ अझर गड्डी
८ पप्पू राम
९ अर्जुन पांडे
१० विनोद वाघ
११ प्रमोद पाठक
१२ अजय सिंग
१३ मनप्रीत बलवंत सिंग
१४ विजय बीर सिंग
१५ मनजित पियारा सिंग
१६ माता प्रसाद
१७ उपेंद्र सिंग
१८ योगेंद्र यादव
१९ नवीन कुमार
२० कुलविंदर सिंग

हेही वाचा - बार्ज पी-305 : प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळेना; मृतांच्या नातेवाईकांचा आरोप

हेही वाचा - गडचिरोलीत पोलीस-नक्षल्यांदरम्यान चकमक, 13 नक्षल्यांना कंठस्नान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.