ETV Bharat / city

Mumbai Crime : बँक उपव्यवस्थापकाने ऑनलाइन जुगारात उडवली १.८५ कोटींची रक्कम - Mumbai Crime

बँक ग्राहकांचे विश्वासाने जमा केलेले 1 कोटी 85 लाख रुपये ( Bank manager Rs 1.85 crore on online gambling ) दादर येथील खासगी बँकेच्या उप शाखा व्यवस्थापकाने ऑनलाइन सट्ट्यावर उडवल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

online gambling
online gambling
author img

By

Published : Jan 21, 2022, 4:14 PM IST

मुंबई - बँक ग्राहकांचे विश्वासाने जमा केलेले 1 कोटी 85 लाख रुपये ( Bank manager Rs 1.85 crore on online gambling ) दादर येथील खासगी बँकेच्या उप शाखा व्यवस्थापकाने ऑनलाइन सट्ट्यावर उडवल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. आरोपीने खोट्या व्यवहाराच्या नोंदी करून सट्टेबाजांच्या 9 बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली. कागदपत्रांच्या तपासणीत बँक नोंदीमध्ये दादर शाखेमध्ये अधिक रोख रक्कम असल्याचे दिसून आले. पण प्रत्यक्ष तपासणीत 1 कोटी 85 लाख रुपये कमी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपी उप शाखा व्यवस्थापकाचे बिंग फुटले

बँकेचे विभागीय प्रमुख राजीव लंगर यांनी याप्रकरणी माटुंगा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बँकेचा उप शाखा व्यवस्थापक विशाल सदाशिव गुरूड (31) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो 2012 पासून बँकेत कार्यरत आहेत. बांद्रा येथील बँकेच्या चलन तपासणी विभागाने दादर शाखेत दोन कोटी पाच लाख 16 हजार ऐवढी रोख रक्कम का ठेवली आहे? याबाबत विचारणा केली होती. त्यावर तपासणी केली असता बँकेत केवळ 29 लाख 16 हजार एवढीच रोख रक्कम असल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार लंगर हे 6 नोव्हेंबर 2021 मध्ये बँकेच्या दादर शाखेत गेले असता त्यांना तेथील शाखा व्यवस्थापक भेटून याबाबतची माहिती दिली. त्यामुळे बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या विशाल गुरूड याची चौकशी करण्यात आली.

काय आहे हे प्रकरण ?

सुरूवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण विश्वासात घेतले असता त्याने बँकेतील पैसे सट्टेबाजीत उडवल्याचे सांगितले. त्याने ते पैसे सट्टेबाजांच्या तीन चालू व सहा इतर खात्यांमध्ये जमा केल्याचे सांगितले. त्यासाठी आरोपीने स्वतःच्या दोन मोबाइल क्रमांकांचा वापर केला आहे. त्याने डायमोंडेक्च डॉट कॉम व डेल्टाईक्च डॉट कॉम या संकेतस्थळांवर हा सट्टा खेळला. एम.के. ऑनलाईन फॅमिली ग्रुप या टेलिग्राम ग्रुपद्वारे सट्टेबाजीशी संबंधीत संकेतस्थळ व अॅप्लिकेशनची माहिती झाल्याचे त्याने सांगितले. हा गैरप्रकार करताना आरोपीने 9 बँक खात्यांमध्ये रोख रक्कम जमा केल्याच्या खोट्या नोंदी केल्या. त्यासाठी कॅश बॅलन्स रजिस्टर व रोख अहवालामध्ये खोट्या नोंदी केल्या. त्यामुळे ही रक्कम कागदोपत्री दिसत होती. पण प्रत्यक्षात ती रोख रक्कम बँकेकडे उपलब्ध नव्हती. बँकेने याप्रकरणी केलेल्या तपासणीत या गोष्टी आढळल्या. त्यामुळे याप्रकरणी माटुंगा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

हेही वाचा - समलिंगी तरुणाशी अ‍ॅपवरुन संपर्क करुन केले घृणास्पद कृत्य; व्हिडिओ काढून दिली धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.