ETV Bharat / city

Bullet Train Underground Station : वांद्रे कुर्ला येथिल बुलेट ट्रेनच्या रेल्वे स्थानकासाठी निविदा जाहीर

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. शिंदे फडणवीस सरकार स्थापन होतात बुलेट ट्रेनचे काम वेगात सुरू झाले असून आता वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील भूमिगत रेल्वे ( Bandra Kurla Complex Underground Station ) स्थानकासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

बुलेट ट्रेन स्थानक
बुलेट ट्रेन स्थानक
author img

By

Published : Jul 22, 2022, 5:21 PM IST

मुंबई - मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला आता जोरदार सुरुवात झाली आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे होणाऱ्या एकमेव भूमिगत रेल्वे स्थानकासाठी एनएचएसआरसीएलने आता पॅकेज सी वन अंतर्गत ( Bandra Kurla Complex Underground Station ) निविदा जाहीर केल्या आहेत. या रेल्वे स्थानकात सहा प्लॅटफॉर्म असणार आहे. तर प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी अंदाजे 415 मीटर असणार आहे. 16 डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी ही लांबी पुरेशी असणार आहे, तर या रेल्वेस्थानकाला जोडणाऱ्या मेट्रो आणि रस्त्यांसाठीही निविदा काढण्यात आली आहे.

एकमेव भूमिगत रेल्वे स्थानक : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स एचएसआर स्टेशन हे मुंबई अहमदाबाद एचएसआर कॉरिडोरवरील एकमेव भूमिगत रेल्वे स्थानक असणार आहे. या रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म जमिनीपासून सुमारे 24 मीटर खोलीवर नियोजित आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म कोर्स आणि सर्विस फ्लोर असे तीन मजले असणार आहेत. स्थानकाचे नियोजन अशा प्रकारे करण्यात आले आहे, की प्रवाशांच्या हालचाली आणि सोयीसुविधांसाठी कम कोर्स आणि प्लॅटफॉर्म स्तरावर पुरेशी जागा उपलब्ध असणार आहे.

नैसर्गिक प्रकाशासाठी स्कायलाईट : या रेल्वे स्थानकात नैसर्गिक प्रकाश मिळावा यासाठी समर्पित स्कायलाईटची तरतूदही करण्यात आली आहे. स्थानकावर प्रवाशांसाठी नियोजित सुविधांमध्ये प्रवाशांची सुरक्षा तिकीट व्यवस्था प्रतीक्षा क्षेत्र बिझनेस क्लास लाउंज, नर्सरी, विश्रांती कक्ष, धूम्रपान कक्ष, माहिती खिडकी आणि प्रसंगी रिटेल सार्वजनिक माहिती आणि घोषणा प्रणाली तसेच सीसीटीव्ही असणार आहे.

व्हेंटिलेशन शाफ्टचाही समावेश : बीकेसी रेल्वे स्थानकासाठी जीवन पॅकेज निविदांमध्ये 467 मीटर चा कट आणि कव्हर आणि 66 मीटरच्या व्हेंटिलेशन शाफ्टचा देखील समावेश आहे. हा शाफ्ट टनेल बोरिंग मशीन बाहेर काढण्यासाठी देखील वापरला जाणार आहे. याशिवाय मेट्रो बस ऑटो आणि टॅक्सी सारख्या वाहतुकीच्या इतर पर्यायांना जोडण्यासाठी एकीकरण करण्याचे देखील नियोजित आहे, अशी माहिती एनएचआरसीएलने दिली.

हेही वाचा - Aditya Thackeray Aurangabad Visit: बंडखोर आमदार विरोधात आदित्य ठाकरे करणार सेनेचे शक्तिप्रदर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.