ETV Bharat / city

एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने निष्ठावान, अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड - थोरात

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खा. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे निष्ठावान अनुभवी व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Apr 28, 2021, 4:07 PM IST

मुंबई - काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खा. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे निष्ठावान अनुभवी व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

'पक्षाने सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व गमावले'

एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे दु:ख झाले आहे. तरुण वयात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे एकनाथ गायकवाड शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सतत कार्यरत असत. जनतेला सहज उपलब्ध असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. धारावीतील जनतेने त्यांना तीन वेळा आमदार आणि दोनवेळा खासदार म्हणून निवडून दिले होते. राज्य मंत्रिमंडळातही त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. पक्ष संघटनेतही त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदा-या पार पाडल्या. अत्यंत कठिण काळात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. दलित चळवळीतही ते सक्रीय होते. त्यांच्या निधनाने पक्षाने सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व गमावले आहे. या कठिण प्रसंगी आम्ही सर्व गायकवाड कुटुंबीयांच्या सोबत आहोत. अशा शद्बात बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ गायकवाड यांंना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा - ऑक्सिजन तुटवड्याला केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास कारणीभूत - पृथ्वीराज चव्हाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.