ETV Bharat / city

बालभवन इमारतीला आंतरराष्ट्रीय दर्जाची केली पाहिजे - वर्षा गायकवाड - varsha gaikwad latest news

बालभवनची इमारत ऐतिहासिक वास्तु असल्यामुळे तिचे जतन व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे नमूद करुन ऐतिहासीक वास्तु आंतरराष्ट्रीय दर्जाची केली पाहिजे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

varsha gaikwad
वर्षा गायकवाड
author img

By

Published : May 5, 2022, 5:50 PM IST

मुबई - बालभवनची इमारत ऐतिहासिक वास्तु असल्यामुळे तिचे जतन व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे नमूद करुन ऐतिहासीक वास्तु आंतरराष्ट्रीय दर्जाची केली पाहिजे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. त्यांनी आज बालभवनचा नूतनीकरण कामाचा उद्घाटन समारंभ केला आहे. बालभवनच्या इमारतीस ७० वर्षे पूर्ण होत असून इमारत जीर्ण झाली आहे, या इमारतीस दुरुस्तीची आवश्यकता आहे. मुलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देऊन बालभवनच्या अध्यक्षा व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या ऐतिहासिक इमारतीच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला होता.Body:एक भव्य दिव्य अशी वास्तू निर्माण करावी - वर्षा गायकवाड

बालभवनची इमारत मुंबईमधील अतिशय महत्त्वाच्या अशा मरिन लाईन्स ठिकणी आहे. भव्य अशी वास्तु आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. या वास्तुचे अशाप्रकारे नूतनीकरण करावे की लोकांना बघताक्षणी कळावे की ही बालभवनची इमारत आहे. यासाठी शिक्षण विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिका-यांनी एकत्रित बसून आपआपल्या संकल्पना मांडाव्यात व त्यानुसार पुढील कार्यवाहीची रुपरेषा आखून एक भव्य दिव्य अशी वास्तू निर्माण करावी अशी अपेक्षाही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शालेय शिक्षण व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्युझियम - बालभवन इमारतीचा दुरुस्तीमध्ये संपूर्ण इमारतीचे मजबुतीकरण करणे, इमारतीचे आतील व बाहेरील बाजूने प्लास्टर करणे, नादुरुस्त दरवाजे खिडक्या बदलणे, स्वच्छतागृहाचे नुतनीकरण करणे, प्लंबिग व विद्युतीकरणाचे नुतनीकरण करणे व संपूर्ण इमारतीस रंग देणे इत्यादी कामाचा समावेश आहे. जवाहर बालभवनच्या पहिल्या मजल्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्युझियम तयार करणे तसेच दुस-या मजल्यावर विविध छंद वर्गांकरीता स्वतंत्र कला दालने निर्माण करणे प्रस्तावित आहे. याकामाचा आराखडा तयार करण्याचे काम सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मधील आर्किटेक्चर विभागाकडून सुरु आहे.

असा आहे इतिहास- बालभवन ही इमारत मुंबईमधील महत्त्वाच्या परिसरातील मरिन लाईन्स या ठिकाणी समुद्राच्या काठावर दिमाखात उभी आहे. या इमारतीचा कोनशिला २४ मे १९५० रोजी भारताचे उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शुभ हस्ते बसविण्यात आली होती. त्यानंतर दिनांक २४ फेब्रुवारी १९५२ रोजी बालभवनचा उद्घाटन समारंभ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते पार पडला. तसेच ०६ डिसेंबर १९५२ रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व मोरारजी देसाई यांनी बालभवनला भेट दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.