ETV Bharat / city

Worli Gas Cylinder Blast : वरळीतील गॅस सिलेंडर स्फोटात लहान बाळाचा मृत्यू

author img

By

Published : Dec 1, 2021, 5:34 PM IST

वरळी येथे एका घरात मंगळवारी सकाळी 7.11 वाजता गॅस सिलेंडरचा स्फोट ( Worli Gas Cylinder Blast ) झाला होता. यात एका चिमुकल्यासह चार जण गंभीर जखमी झाले होते. त्या चार महिन्याच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू ( Baby Dies Gas Cylinder Blast ) झाला आहे.

Worli Gas Cylinder Blast
वरळीतील गॅस सिलेंडर स्फोटात लहान बाळाचा मृत्यू

मुंबई - वरळी येथे काल मंगळवारी सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट ( Worli Gas Cylinder Blast ) झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले होते. त्यापैकी एक चार महिन्याचे बाळ होते. कुटुंबाच्या उपचाराला नायर रुग्णालयात उशीर झाल्याने या प्रकरण्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. जखमींपैकी तीन जणांना पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. त्यामधील चार महिन्याच्या लहान बाळाचा रात्री मृत्यू ( Baby Dies Gas Cylinder Blast ) झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

वरळी गॅस सिलेंडर स्फोट -

गणपतराव जाधव मार्ग बीडीडी चाळ क्रमांक 3, कामगार वसाहत, वरळी येथे एका घरात काल सकाळी 7.11 वाजता गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घरामध्ये आग लागली. याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत जखमी झालेल्या 4 जणांना मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने या कुटुंबाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नायर रुग्णालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, चार जखमींपैकी एका गंभीर अवस्थेतील रुग्णाला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तीन रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात भाजलेल्या रुग्णांसाठी विशेष असलेल्या वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे.

लहान बाळाचा मृत्यू -

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ४ रुग्णांपैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. नायर रुग्णालयात आनंद पुरी वय 27 वर्षे (गंभीर) यांच्यावर तर कस्तुरबा रुग्णालयात विद्या पुरी 25 वर्षे व विष्णू पुरी 5 वर्षे यांच्यावर उपचार सुरु आहेत. काल रात्री गंभीर जखमी असलेल्या मंगेश पुरी या ४ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.

चौकशीचे आदेश -

वरळीतील गणपतराव जाधव मार्गावर स्थित कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये काल सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये चार महिने वय असलेल्या एका बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला आणि एक पुरुष असे चौघे जण भाजले आहेत. घटनास्थळी महानगरपालिका अग्नीशमन दल, विभाग कार्यालयातील यंत्रणा तसेच पोलीस यांनी मदतकार्य करुन चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तथापि, रुग्णालयात संबंधित रुग्णांवर उपचारांमध्ये दिरंगाई झाल्याचा आरोप करणारी चित्रफित निदर्शनास आली असून त्याची तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नायर रुग्णालयाचे उप-अधिष्ठाता सदर दिरंगाई प्रकाराची चौकशी करणार आहेत. चौकशी अंती कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार व कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - सिलिंडर स्फोटातील रुग्णांच्या उपचारांमध्ये दिरंगाई, खात्यांतर्गत चौकशीचे आदेश

हेही वाचा - Gas Cylinder Explosion : वरळीत गॅस सिलेंडरचा स्फोट, चार जखमींपैकी दोन गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.