मुंबई - महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१ वी जयंती संपूर्ण देशभर उत्साहात साजरी केली जात आहे. मुंबईमध्ये चैत्यभूमी येथे येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वंदन केले. याप्रसंगी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. त्याचबरोबर शिवाजी पार्क येथे उभारण्यात आलेल्या व्हिविंग गॅलरीचाही त्यांनी आढावा घेतला.
व्हिविंग गॅलरी उत्कृष्ट संकल्पना - याप्रसंगी दादर चौपाटी येथे उभारण्यात आलेल्या विविध गॅलरीचा सुद्धा त्यांनी आढावा घेतला. ही विद्यालये त्यांनी प्रथमच पाहिली आहे, अशाच पद्धतीची गॅलरी गिरगाव चौपाटी येथे सुद्धा उभारण्यात आली आहे. गॅलरी पाहून ही उत्कृष्ट संकल्पना असल्याचे त्याने सांगितले. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या विविंग गॅलरी मुंबईमध्ये उभारण्यात यायला हव्यात असेही ते म्हणाले. त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, त्याचबरोबर खासदार राहुल शेवाळे हे सुद्धा उपस्थित होते.
२०२४ पर्यंत पूर्ण करणार बाबासाहेबांचे स्मारक! - इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी उशीर होत आहे. त्याबाबत लवकरच हे स्मारक पूर्ण करण्यात येणार असून २०२४ पर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याचा संकल्प आहे. परंतु त्या अगोदर सुद्धा हे स्मारक पूर्णत्वास येऊ शकते. दोन आठवड्यांमध्ये खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे येऊन या कामाचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर बाबासाहेबांची दुर्मिळ छायाचित्र शोधण्यासाठी त्यांनी वरिष्ठ स्तरावर आदेश दिले आहेत. या दुर्मिळ छायाचित्रांचे एक मोठी प्रदर्शनीय गॅलरी या स्मारकात उभारण्यात येणार असल्याचेही राहुल शेवाळे यांनी याप्रसंगी सांगितले.