ETV Bharat / city

रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल करा; आयुष टास्क फोर्सची मागणी - Ramdev Baba latest news

जगभरात कॊरोनाचा कहर आहे. जगभरातील शास्त्रज्ञ यावर औषध शोधत आहेत. पण अजून रामबाण औषध सापडलेले नाही. असे असताना रामदेव बाबांनी सात दिवसात कॊरोना बरे करणारे औषध शोधल्याचा दावा केला आहे. कोरोनील आणि स्वसारी अशी ही दोन औषधे असून यामुळे 100 टक्के कॊरोना बरा होतो असा त्यांचा दावा आहे.

ramdev baba
बाबा रामदेव
author img

By

Published : Jun 24, 2020, 9:23 PM IST

मुंबई - रामदेव बाबा यांनी पतंजली आयुर्वेदिक कंपनीच्या माध्यमातून आपण कॊरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला आहे. यावरून मोठा वाद सुरू झाला असून, रामदेव बाबांविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. अशात आता राज्याच्या आयुष टास्क फोर्सने यावर नाराजी व्यक्त करत रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर रामदेव बाबा हे शास्त्रज्ञ नाहीत ते सेल्समन आहेत हे नागरिकांना चांगलेच माहित आहे, तेव्हा नागरिक त्यांच्या या प्रसिद्धी तंत्राला भुलणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. शुभा राऊळ - सदस्य, आयुष टास्क फोर्स

जगभरात कॊरोनाचा कहर आहे. जगभरातील शास्त्रज्ञ यावर औषध शोधत आहेत. पण अजून रामबाण औषध सापडलेले नाही. असे असताना रामदेव बाबांनी सात दिवसात कॊरोना बरे करणारे औषध शोधल्याचा दावा केला आहे. कोरोनील आणि स्वसारी अशी ही दोन औषधे असून यामुळे 100 टक्के कॊरोना बरा होतो असा त्यांचा दावा आहे. यावर आयुष टास्क फोर्सच्या सदस्या डॉ शुभा राऊळ यांनी आक्षेप घेतला आहे. आयसीएमआरकडून संशोधन करण्याबाबत रितसर परवानगी घेतली की नाही ते आयुष विभाग बघेलच.पण पतंजलीची मोठी चूक ही की ज्या पद्धतीने जाहिरात केली त्यासाठी advertising and magic remedies act अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. हे अशा कोरोनाच्या नाजूक काळात भोळ्या भाबड्या जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासारखे आहे.

आयुर्वेदावर परदेशातसुद्धा श्रद्धा वाढत आहे. तर पतंजलीने काही नवीन औषध बनवले नाहीये. ही औषधं आयुषच्या मार्गदर्शक त्त्वामध्ये कोविडसाठी सांगितली आहेतच, अशी प्रतिक्रिया डॉ राऊळ यांनी दिली आहे. रामदेव बाबा हे सेल्समन आहेत. ते शास्त्रज्ञ नाहीत, हे समजु शकणारी जनता आहे. त्यामुळे त्यांच्या या फुटकळ दाव्याला कुणी भुलणार नाही, असे आयुष टास्क फोर्सचे सदस्य डॉ उदय कुलकर्णी यांनी म्हटले आहे. तर गुन्हा दाखल करायचाच झाला तर तो जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत दाखल करता येईल, असेही डॉ कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.