मुंबई - नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक नवी ऑडिओ क्लिप (Audio Clip) ट्विटरवर शेअर केली आहे. यामध्ये अनिल बोंडे (Anil bonde) यांचा आवाज असल्याचा मालिकांचा दावा आहे. यात अनिल बोंड अमरावतीमध्ये झालेल्या दंगली (Amravati Violence) संदर्भात बोलताना दिसत आहे. त्यावर "झूट बोले कव्वा काटे" असं म्हणत म्हणत नवाब मलिक यांनी टीका केली आहे.
त्रिपुराच्या कथित घटनेबाबत (Tripura violence) पडसाद महाराष्ट्रात उमटलेले पाहायला मिळाले. नांदेड अमरावती आणि मालेगाव या तीन ठिकाणी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. खास करून अमरावतीमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. हा हिंसाचार भाजपचे आमदार अनिल बोंडे (Anil bonde) यांनी भडकला असल्याचा दावा करणारे ट्विट राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप जाहीर केली असून या ऑडिओ क्लिप मधला आवाज भाजप आमदार अनिल बोंडे यांचा असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केलाय. तसेच "झूट बोले कव्वा काटे" असं म्हणत हा ऑडिओ क्लिप ट्विट केला आहे.
-
Listen to this BJP MLA from Amravati
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 18, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
झूठ बोले कौआ काटे... pic.twitter.com/7ch15MREqz
">Listen to this BJP MLA from Amravati
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 18, 2021
झूठ बोले कौआ काटे... pic.twitter.com/7ch15MREqzListen to this BJP MLA from Amravati
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 18, 2021
झूठ बोले कौआ काटे... pic.twitter.com/7ch15MREqz
ऑडिओ क्लिप मधील आवाज अनिल बोंडे यांचा असल्याचा दावा
ऑडिओ क्लिपमध्ये येणारा आवाज अनिल बोंडे यांचा असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केलाय. तसेच या ऑडिओ क्लिप मध्ये देशात मोदी सरकार आलं त्यानंतर कोठेही दंगली घडल्या नाहीत. तसेच राज्यामध्ये पाच वर्ष देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे सरकार होते तेव्हा ही राज्यात कोणत्याही दंगली घडल्या नाही. मात्र ज्या ठिकाणी भाजपशासित राज्य नसतो अशा ठिकाणी दंगली घडतात. असा आशय या ऑडिओ क्लिप मध्ये संपूर्ण संभाषण हा मध्ये जाणवत आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण भाजपाची संबंधित असल्याचा आरोप नवाब मलिक यांच्या कडून पुन्हा एकदा करण्यात येतोय.